=============
#विज्ञान_लघुकथा - १
=============
====
#विज्ञान_लघुकथा - १
=============
पृथ्वीवरच्या ट्रेनिंग सेशनसाठी स्वस्तिकने होकार कळवला आणि त्याचे मन एका अनामिक दडपणाने भरून गेले. आठव्या वर्षी 'ताणशमका'ची लस टोचून घेतल्यापासून, एकदाही त्याला असे दडपण जाणवले नव्हते. तसाही डिफॉल्ट बॉडीसूट न घालता, सलग सातआठ दिवस राहण्याचा अनुभवही त्याला होता, युरोपावरच्या 'पृथ्वी प्रतिरूप कोशा'मध्ये, त्याने तो अनुभव अनेकदा घेतला होता, आणि पृथ्वीवर जाऊन, तिथल्या मानव अभयारण्यात तब्बल एक महिना काढायचा म्हणजे थोडा वेगळा प्रकार असणार आहे याचा त्याला अंदाज आला होता.
ExpoPlanetary Habitation Program ला त्याने प्रवेश घेतला, तेंव्हाच हे ट्रेनिंग या कोर्सचा भाग आहे याची कल्पना त्याला देण्यात आली होती. त्यामुळे पृथ्वीवर प्रत्यक्ष जाण्याची वेळ येईल, तेंव्हा आपल्याला असे काहीतरी वाटेल, असे त्याला अजिबात वाटले नव्हते. शिवाय अभयारण्यातल्या अनुभवाचे सर्व Brain Feed, त्याने स्वत:च्या बाह्यमेंदूत साठवले होते. त्यामुळे असे का वाटावे याचे कारण काही त्याला उमगेना. न राहवून तो Personal Health Pod मध्ये शिरला. PHP च्या स्क्रीनवर 'अज्ञाताची भीती' असे कारण झळकले आणि त्याचे दडपण वाढले.
शेवटचा पर्याय म्हणून, त्याने Brain Feed Update ची विनंती पाठविली. Update पूर्ण झाली आणि घाईघाईत त्याने Health Pod वरचे Rescanning चे बटन दाबले. PHP च्या स्क्रीनवरचे शब्द बदलले, त्या दडपणाचे संभाव्य कारण तिथे झळकले.
"यंत्रविरहित वातावरणात, अनोळखी मानवसमूहासोबत जगण्याची भीती"
====
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा