(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)
====
"नमस्कार. एक तासानंतर आपले यान, अंतराळनगर क्रमांक सत्तावीस वर उतरेल. ज्या यात्रेकरूंना इथे उतरायचे आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी, त्यांच्या मजल्यावरील कक्ष क्रमांक चार मध्ये जावे. पुढील सूचना तुम्हाला तिथे दिल्या जातील." उद्घोषणा होताच स्वस्तिकच्या शेजारी बसलेल्या त्या वृद्ध माणसाने स्वस्तिकचा हात आपल्या हातात घेतला.
"तुझ्यासोबत वेळ छान गेला मित्रा. आता आपली भेट पुन्हा होणार नाही, पण तू पृथ्वीवर गेल्यावर, माझा सल्ला तुला उपयुक्त ठरला आहे असे तुला वाटले तर तुझ्या फीडबॅकमध्ये त्याचा उल्लेख कर, म्हणजे पुढे त्याचा समावेश अनुभवग्रंथात होईल आणि पुढे देखील तो दुसर्या कुणाला देखील उपयोगी पडेल" तो वृद्ध खणखणीत आवाजात म्हणाला.
"नक्कीच. असे प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्ष ऐकणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंतर तुमच्या अनुभवाचा फायदा, अजूनही अनेकांना थेट होऊ शकतो. तुमच्यासोबत इतका वेळ घालवल्यानंतर मला असे मनापासून वाटते, की अजून काही वर्षे सक्रिय आयुष्य नक्की जगू शकता तुम्ही. तुम्हाला समर्पण करण्याचा आदेश कसा मिळाला, याचेच मला अजूनही आश्चर्य वाटतंय." स्वस्तिकच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि त्याला स्वत:चेच आश्चर्य वाटले. 'मी पूर्वी असे कुणाशी बोललो नव्हतो' त्याच्या मनात आले.
"पाच वर्षांपूर्वीच्या देह तपासणीनंतर, मी माझ्या मनाची तयारी केली होती. त्यामुळे मला आणखी पाच वर्षे मिळाली हेच विशेष आहे. अतिशय समृद्ध आयुष्य जगलो मी. तसेही न्यायमंडळाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन, फारसे काही साध्य होत नाही. आणि माझा मेंदू अनुभवजालात जोडला जाणार आहे, तेंव्हा आणखी किमान साठ वर्षे तरी माझा मेंदू अस्तित्वात राहणार आहे. त्याचे समाधान आहे"
त्या वृद्धाच्या चेहेर्यावरचे हास्य स्वस्तिकला अस्वस्थ करत होते. से हास्य त्याने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. स्वस्तिकचा निरोप घेऊन समोरच्या दारातून तो वृद्ध बाहेर पडला तरी त्या वृद्धाचा विचार त्याच्या मनातून जाईना.
स्वस्तिकच्या मनात अचानक एक वेगळीच भावना दाटून आली होती, त्याने पूर्वी कधीही न अनुभवलेली. 'समर्पणाच्या अनेक घटना पूर्वीदेखील आपण बघितल्या आहेत, पण तेंव्हा आपण अस्वस्थ झालो नव्हतो. ' त्याच्या मनात आलेल्या विचाराला त्याच्या बाह्यमेंदूने परस्पर उत्तर दिले. 'सहानुभूती म्हणतात या भावनेला'
'यापूर्वी आपण असे कधीच वागलो नाही. त्याच्या पुन्हा मनात आले.
त्याला आठवले 'तो पृथ्वीचा चंद्र जवळ येऊ लागला आणि आपल्यात काहीतरी बदल होऊ लागला.'
त्याच्या मनातील विचार थांबतच नव्हते. 'तो चंद्र ओलांडल्यापासूनच , माझा मेंदू काही नवीन भावना अनुभवतो आहे. मन एकाग्र करायला कठीण जात आहे'
'पण हे असे चालायचे नाही, एकाग्रता कमी पडता कामा नये. हे प्रशिक्षण व्यवस्थित पार पडायलाच हवे. इतके कष्ट केलेत या प्रशिक्षणासाठी, ते वाया जाता कामा नयेत. ' त्याने स्वत:लाच बजावले.
त्याने त्याच्या बाह्यमेंदूत साठविलेले नियमपुस्तक पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. नियम क्रमांक सहा हजार पाचशे बावन्न, त्याला पुन्हा एकदा खटकला. हस्तक्षेपाचे नियम जरा जास्तच जाचक आहेत असे त्याला पुन्हा एकदा वाटले. त्याने त्या मागची कारणे वाचायला सुरुवात केली.
इतक्यात पुन्हा एकदा नवीन उद्घोषणा त्या यानात घुमली. 'आपण आता अंतराळनगर सत्तावीसवरून प्रस्थान करत आहोत. अठरा मिनिटात आपण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीवरील प्रदूषण स्तर पिङ्गल एक आहे. पृथ्वीवरील किरणोत्सर्गाचा स्तर रक्तिम दोन आहे.
तेंव्हा ज्या यात्रेकरूंना पृथ्वीवर उतरायचे आहे, त्यांनी अवकाशवेश परिधान करणे बंधनकारक आहे. अधिक सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही तुमच्या कॅप्सुलमध्ये प्रवेश करू शकता. तुम्हाला सूचित करण्यात येते की स्वत:चा अवकाशवेश अभयारण्यात पोहोचेपर्यंत काढू नये. नियमबाह्य वर्तनामुळे वा सूचना न पाळल्यास होणार्या हानीची जबाबदारी संपूर्णपणे वैयक्तिक राहील. अशा हानीची जबाबदारी आणि भरपाई तिकिटासोबत करण्यात आलेला तुमचा यात्राविमा करणार नाही याची नोंद घ्यावी. आपले पृथ्वीवरचे वास्तव्य सुखाचे होवो."
स्वस्तिक ज्या क्षणाची काहीशा अनिच्छेने वाट पहात होता, तो क्षण आता काही मिनिटांवर येऊन ठेपला होता.
======
क्रमश:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा