(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)
---- मागील भागावरून पुढे ----
====
सोमवारपासून विसुने त्याच्या स्टाफला कामाला लावले. आणि त्याचे फळ त्याला दोन दिवसातच मिळाले. मंगळवारपासूनच DEPLशी संबंधित, प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती असलेल्या डॉक्युमेंट्सचा, स्प्रेडशीट्सचा त्याच्या ईमेलमध्ये पूर आला. नंतरचे दोन दिवस त्याच्यासाठी अत्यंत व्यग्रतेत गेले. प्रत्येक व्यक्तीची माहिती वाचणे, मनात साठवणे, त्याची टिपणे काढणे यात त्याचा पूर्ण दिवस जात होता. या केसने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता. गुरुवारी दुपारपर्यंत सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग देखील दोनदा बघून झाले होते. एकाही व्यक्तीविरोधात त्याला काहीही ठोस सापडले नव्हते.
'आता शनिवारी देशमुखशी बोलून थोडी मुदत वाढवून घ्यावी लागणार बहुतेक' हा विचार विसुच्या मनात यायला आणि त्याचा मोबाईल वाजायला एकच गाठ पडली.
"बोल देशमुख. ठरल्याप्रमाणे तुला फोन करणारच होतो शनिवारी." -- विसु
"नाही ते आहे माझ्या लक्षात. पण अडचण थोडी वाढली आहे." देशमुखांच्या स्वरात चिंता ओसंडून वाहात होती.
"काय झालं अचानक ?"
"तू वेगळ्या लॅपटॉपबाबत सुचविलं होतंस ना ? मी रविवारीच नवीन लॅपटॉप घेतला, DDDD च्या शोरूममधून. त्यात जी काही सॉफ्टवेअर त्याच्या सोबत आली तेवढीच. त्यापेक्षा दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर मी त्या नवीन लॅपटॉपवर लोड केलेले नाही. अगदी सीसीटीव्हीचे सॉफ्टवेअर सुद्धा नाही आणि सोमवार पासून तोच लॅपटॉप मी वापरतो आहे. दुसर्या कुणालाही लॅपटॉपला हात लावून दिला नाही. मंगळवारी दुपारनंतर एक टेण्डर फायनल करून मी पाठवलं. अगदी शेवटच्या दिवशी. त्यानंतर संध्याकाळी, अगदी शेवटच्या क्षणी न्यू एराचे टेण्डर देखील त्यांना मिळालं. आत्ता थोड्या वेळापूर्वी सुकाळेचा फोन आला होता. हे टेण्डरदेखील न्यू एराला मिळणार आहे म्हणून." एका दमात देशमुखांनी सगळा घटनाक्रम सांगितला.
"बोल देशमुख. ठरल्याप्रमाणे तुला फोन करणारच होतो शनिवारी." -- विसु
"नाही ते आहे माझ्या लक्षात. पण अडचण थोडी वाढली आहे." देशमुखांच्या स्वरात चिंता ओसंडून वाहात होती.
"काय झालं अचानक ?"
"तू वेगळ्या लॅपटॉपबाबत सुचविलं होतंस ना ? मी रविवारीच नवीन लॅपटॉप घेतला, DDDD च्या शोरूममधून. त्यात जी काही सॉफ्टवेअर त्याच्या सोबत आली तेवढीच. त्यापेक्षा दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर मी त्या नवीन लॅपटॉपवर लोड केलेले नाही. अगदी सीसीटीव्हीचे सॉफ्टवेअर सुद्धा नाही आणि सोमवार पासून तोच लॅपटॉप मी वापरतो आहे. दुसर्या कुणालाही लॅपटॉपला हात लावून दिला नाही. मंगळवारी दुपारनंतर एक टेण्डर फायनल करून मी पाठवलं. अगदी शेवटच्या दिवशी. त्यानंतर संध्याकाळी, अगदी शेवटच्या क्षणी न्यू एराचे टेण्डर देखील त्यांना मिळालं. आत्ता थोड्या वेळापूर्वी सुकाळेचा फोन आला होता. हे टेण्डरदेखील न्यू एराला मिळणार आहे म्हणून." एका दमात देशमुखांनी सगळा घटनाक्रम सांगितला.
"आपण सोडवू हा गुंता लवकरच. मला तुझी चिंता समजतेय रे. पण आता एक नक्की झालं, की तुझ्या कंपनीमधला कुणीतरी फितूर आहे आणि तुझ्या टेण्डरमधले आकडे, न्यू एराला पोहोचत आहेत." विसुने देशमुखांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण देशमुख ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
"नाही रे तसं नाही. म्हणजे यावेळेला, मी दुसर्या कुणालाही टेण्डर तयार करताना सामीलच केलं नव्हतं. अगदी नंदिनीदेखील नाही. सुरुवातीच्या काळात, जसा मी एकट्यानेच टेण्डर भरत असे, तसेच केले. यावेळी मी कंपनीचे वायफाय देखील वापरले नव्हते. माझ्या मोबाईलचे इंटरनेट शेअर करून वापरले." -- देशमुख
देशमुख हवालदिल झाल्याचे विसुला जाणवले. त्यांना शांत करणे आवश्यक होते.
हा प्रकारही काहीतरी वेगळा आहे, हे विसुच्या लक्षात आले होते. ऑफिसमधल्या कुणावरही संशय घेण्यासारखी परिस्थिती नाही, हे देशमुखांना आत्ता सांगण्यात अर्थच नव्हता. कदाचित आपल्यालाच सर्व गोष्टी नव्याने तपासायला लागतील असे विसुच्या मनात आले.
"देशमुख, मला दोन-तीन दिवस दे. रविवारी आपण दोघेच तुझ्या ऑफिसमध्ये भेटू. मला पुन्हा एकदा सर्व तपासणी करायची आहे." विसुने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.
"तू म्हणालास त्या प्रमाणे, माझा पहिला लॅपटॉपसुद्धा विराजने चेक केला, त्यात एक मॅलवेअर सापडले, पण ते एका जुन्या कॉम्प्रेस फाईलमध्ये होते आणि अॅक्टिव्ह नव्हते असे त्याचे म्हणणे आहे. बाकी तसं काही विशेष नाही सापडलं त्याला. " देशमुखांनी अधिक स्पष्टीकरण दिले.
"हे बघ. हा काहीतरी अधिक गुंतागुंतीचा प्रकार आहे हे माझ्याही लक्षात आलंय. पण मला थोडा वेळ हवाय. मी तुझ्या ऑफिसमधला फितूर शोधून देईन हा माझा शब्द आहे." -- विसु
"तुझ्याच भरवशावर आहे रे आता. पण हे असेच चालू राहिले तर माझ्या बिझनेसला मोठा फटका बसेल भविष्यात. इथे अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे हा क्लायन्ट गमाविणे, मला सध्या तरी परवडण्यासारखे नाही आहे." -- देशमुख
"तू माझ्यावर विश्वास ठेव." -- विसु
"हे बघ. हा काहीतरी अधिक गुंतागुंतीचा प्रकार आहे हे माझ्याही लक्षात आलंय. पण मला थोडा वेळ हवाय. मी तुझ्या ऑफिसमधला फितूर शोधून देईन हा माझा शब्द आहे." -- विसु
"तुझ्याच भरवशावर आहे रे आता. पण हे असेच चालू राहिले तर माझ्या बिझनेसला मोठा फटका बसेल भविष्यात. इथे अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे हा क्लायन्ट गमाविणे, मला सध्या तरी परवडण्यासारखे नाही आहे." -- देशमुख
"तू माझ्यावर विश्वास ठेव." -- विसु
देशमुखांनी कॉल कट केला, पण तोपर्यंत पलीकडची अस्वस्थता विसुच्या मनात झिरपली होती.
--
पुन्हा पहिल्यापासून सर्व फाईल्स वाचाव्यात की जे वाचले आहे, जे डोक्यात आहे त्यावर चिंतन करत बसावे या द्विधा मनस्थितीत असताना, विसुचे हात मात्र त्याच्या मेंदूतल्या विचारप्रक्रियेशी, काहीही देणेघेणे नसल्याप्रमाणे समोरच्या लॅपटॉपवर चालत होते आणि स्क्रीनवरचा ब्राऊजर निरर्थक सर्फिंग करण्यात मग्न झाला होता. अचानक ब्राऊजरमध्ये एक जाहिरात फ्लॅश झाली आणि विसुच्या डोक्यातील विचारचक्र थांबले. त्याने झपाट्याने, त्या उत्पादनांविषयी सर्व माहिती शोधायला, वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यापुढे माहितीचा एक प्रचंड मोठा खजिना, उघडा झाला.
"विसुभाऊ, आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची सवय, तुमच्या वाढत्या वयासोबत लोप पावते आहे" विसु स्वत:शीच पुटपुटला आणि काहीशा उत्कंठीत मनाने त्याने देशमुखांचा मोबाईल क्रमांक टॅप केला.
पलीकडून हॅलो यायच्या आतच , "येत्या रविवारी, आपण तुझ्या ऑफिसमध्ये भेटतो आहोत. फक्त आपण दोघेच. असे सांगत आणि पलीकडे देशमुखांना गोंधळात पाडत विसुने तो कॉल कट केला.
--
रविवारी देशमुखांच्या ऑफिसात नवरेने विसुचे स्वागत केले. "सर, कधीची वाट पाहत आहेत तुमची."
"अरे हो. माझे बोलणे झाले आहे त्यांच्याशी. ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. " विसुने अकारण स्पष्टीकरण दिले.
"साहेब, तुम्हाला कॉफी आणू का ?"
"नाही, काही नको आणि तू इथे बाहेरच थांब. आम्ही बोलाविल्याशिवाय केबिनमध्ये यायचं नाही."
"अरे हो. माझे बोलणे झाले आहे त्यांच्याशी. ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. " विसुने अकारण स्पष्टीकरण दिले.
"साहेब, तुम्हाला कॉफी आणू का ?"
"नाही, काही नको आणि तू इथे बाहेरच थांब. आम्ही बोलाविल्याशिवाय केबिनमध्ये यायचं नाही."
विसु केबिनमध्ये शिरला, तेंव्हा देशमुख, त्यांच्या केबिनच्या खिडकीतून बाहेर कुठेतरी शून्यात बघत बसले होते. विसुची चाहूल लागताच त्यांच्या मनातील खळबळ, त्यांच्या चेहेर्यावर उमटली.
"आज बहुतेक तुझ्या ऑफिसमधला फितूर सापडेल." विसुने देशमुखांना दिलासा दिला. "मी आता इथे काही तपासण्या करणार आहे. त्या पूर्ण होईस्तोवर शक्यतो आपण नको बोलूया."
देशमुखांनी मान डोलावली. विसुने एकदा त्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिले आणि स्वतला काहीतरी समजावत असल्याप्रमाणे मान हलवली.
त्यानंतर विसुने त्याच्या बॅगेतून वेगवेगळी उपकरणे काढली आणि त्यातील एक उपकरण त्याने केबिनच्या मध्यभागी ठेवून सुरू केले. त्या उपकरणातून 'बीप,बीप' असा आवाज येऊ लागला तेंव्हा कुतुहलाने देशमुख त्यांच्या खुर्चीतूनच वाकून बघू लागले. विसुने त्यांना हातानेच खिडकीजवळच्या सोफ्यावर बसण्याची खूण केली. त्याने केलेल्या इशार्याप्रमाणे देशमुख उठले आणि सोफ्यावर जाऊन बसले. त्या उपकरणाला एक छोटा स्क्रीन होता आणि त्याच्यावर एक सिग्नल वरखाली होत होता.
विसुने ते उपकरण हातात घेऊन केबिनच्या चहूकडे फिरवण्यास सुरुवात केली. मध्येच त्या उपकरणातून येणार्या बीपची फ्रिक्वेन्सी बदलत होती, मध्येच आवाजही कमी-अधिक होत होता. जवळजवळ अर्धा तास विसुने चौफेर तपासणी केली. त्या केबिनचे कानाकोपरे, जमीन, छत, केबीनला असणारी एकमेव खिडकी, आग प्रातिबंधक यंत्रणेचे, छतावर असणारे स्प्रिंकलर्स, खिडकीसमोरच्या भिंतीवर, समकेंद्री वर्तुळे असलेल्या चित्राची फ्रेम, त्या खोलीतील सर्व खुर्च्या, टेबल आणि इतर फर्निचर, फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, यंत्रे, अक्षरश: प्रत्येक गोष्ट विसु, प्रथम त्या उपकरणाने आणि नंतर इतर उपकरणे वापरुन, वारंवार तपासत होता. त्याच्या तपासणीतून स्वत: देशमुख देखील सुटले नाहीत. त्या अर्ध्या तासाच्या कसून तपासणीनंतर त्याने देशमुखांना केबिनबाहेर चलण्याची खूण केली.
त्याच्यामागोमाग देशमुखदेखील केबिनबाहेर आले आणि दोघेही एकत्रच तिथल्या सर्व्हर रूममध्ये शिरले.
--
"मला दोन फितूर सापडले आहेत." विसुने तोंड उघडले आणि देशमुखांच्या चेहेर्यावरचा ताण कमी झाला.
"दोन फितूर ? काही इन्स्ट्रुमेंट हॅक झाली आहेत का ? म्हणजे मला असं वाटलं तुझ्या तपासण्या पाहून." -- देशमुख
"तसं नाही" विसुच्या स्वरात आणि चेहेर्यावर अनपेक्षित धक्का सहन करून, शांत झाल्याच्या खुणा होत्या. "पण तरीही तुझी अख्खी केबिनच फितूर आहे"
"दोन फितूर ? काही इन्स्ट्रुमेंट हॅक झाली आहेत का ? म्हणजे मला असं वाटलं तुझ्या तपासण्या पाहून." -- देशमुख
"तसं नाही" विसुच्या स्वरात आणि चेहेर्यावर अनपेक्षित धक्का सहन करून, शांत झाल्याच्या खुणा होत्या. "पण तरीही तुझी अख्खी केबिनच फितूर आहे"
"काय बोलतो आहेस तू ? " देशमुखांच्या तोंडातून पुटपुटल्यासारखे शब्द घरंगळले. "केबिन फितूर आहे ? म्हणजे ? आणि दुसरा फितूर कोण आहे मग ?"
"दुसरा फितूर तू स्वत: आहेस. " विसु ठामपणे आणि एकेक शब्द सुटा उच्चारत म्हणाला. "पण तुझ्याच नकळत"
"दुसरा फितूर तू स्वत: आहेस. " विसु ठामपणे आणि एकेक शब्द सुटा उच्चारत म्हणाला. "पण तुझ्याच नकळत"
--
तो काय म्हणाला हे देशमुखांच्या मेंदूपर्यंत पोहोचायला काही वेळ लागला. तितक्या वेळात बधीरता, अविश्वास, आश्चर्य, राग या आणि अशा अनेक भावना देशमुखांच्या चेहेर्यावर झळकून गेल्या. हा धक्का पचविणे देशमुखांना प्रचंड जड जात होते.
"तुला काय म्हणायचाय , माझे नुकसान मी स्वत:च करून घेतोय ? " -- देशमुखांच्या स्वरात चीड होती.
"एका अर्थाने होय. पण तुझ्या स्वत:च्या नकळत." - विसु शांतपणे म्हणाला.
"तू नीट सांगशील. माझं डोकं जड झालाय." -- देशमुख
"तू पाच मिनिटे शांत बस. टेन्शन घेऊ नकोस. मी तुला सविस्तर सांगतो" - विसु
"तुला काय म्हणायचाय , माझे नुकसान मी स्वत:च करून घेतोय ? " -- देशमुखांच्या स्वरात चीड होती.
"एका अर्थाने होय. पण तुझ्या स्वत:च्या नकळत." - विसु शांतपणे म्हणाला.
"तू नीट सांगशील. माझं डोकं जड झालाय." -- देशमुख
"तू पाच मिनिटे शांत बस. टेन्शन घेऊ नकोस. मी तुला सविस्तर सांगतो" - विसु
पाच मिनिटांनी विसुने बोलायला सुरुवात केली.

"देशमुख, यावेळेस प्रथमच मी माझ्या सगळ्या स्टाफला, एकाच केसवर कामाला लावले आणि माझा जवळचा मित्र म्हटल्यावर त्या सर्वांनीही प्रचंड मेहनत केली. अक्षरश: आम्ही कधी न वापरलेले, वेगवेगळे सोर्स वापरुन, तुझ्या कंपनीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची तपशीलवार माहिती मिळवली आहे त्यांनी. तुझ्या ऑफिसमधली, तुझ्या कंपनीशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, माझ्या स्टाफमधल्या कुणा ना कुणाशी फेसबूक, व्हाट्सअॅप किंवा अन्य एखाद्या माध्यमातून याक्षणी जोडलेली आहे. पण इतके सर्व करूनसुद्धा, आज दुपारपर्यंत मला काहीही ठोस सापडले नव्हते. मग तुझ्या आजच्या फोनने ठिणगी पडली आणि त्याचवेळी मला नशिबाने देखील साथ दिली. अचानक मला या केसला उपयुक्त ठरेल, अशी बरीच माहिती इंटरनेटवर सापडली आणि मग मी थोड्या वेगळ्या प्रकाराने या केसचा विचार केला. त्यानंतरच्या दोन दिवसात, तू मगाशी बघितलीस ती सर्व उपकरणे जमवली मी. मी आज जे पहिले उपकरण वापरले ना, त्याला 'बग डिटेक्टर' म्हणतात. लपविलेले कॅमेरे, मायक्रोफोन, आरएफआयडी आणि तत्सम इतर हेरगिरी करणारी विविध उपकरणे शोधण्यासाठी त्याचा वापर होतो. या अशा हेरगिरी करणार्या सामुग्रीला एकत्रितपणे 'बग्ज' असे म्हटले जातं, म्हणून बग डिटेक्टर. तुझ्या केबिनमध्ये जागोजागी असे 'बग्ज' असतील असे मला वाटत होते, पण तसे नाही. ज्या कुणी हे केले आहे, त्याने अतिशय हुशारीने आणि सावधपणे हे केलंय आणि मुख्य म्हणजे त्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान सर्वसाधारण नाही. म्हणजे जिथे 'बग्ज' असू शकतील, असे शोधणार्याला वाटेल, तिथे ते नाहीतच. तिथल्या खुर्चीत नाहीत, सोफ्यात नाहीत, इलेक्ट्रॉनिक उपकरणात नाहीत, फोनमध्ये नाहीत, वरती स्प्रिंकलरमध्ये पण नाहीत. ते खिडकीसमोरच्या भिंतीवर एक चित्र आहे ना, समकेंद्रित वर्तुळाचे, ते कुठून विकत घेतलेस तू ?"
"तेऽ, ती फ्रेम मला भेट म्हणून मिळाली होती, एका व्हेंडरकडून. चारपाच महिन्यांपूर्वी असेल." देशमुखांनी आठवून सांगितले. "एकाग्रतेसाठी त्याचा वापर होतो असे म्हणाला होता तो. म्हणून मी ती फ्रेम त्या भिंतीवर लावली. तिथे प्रकाश चांगला येतो समोरच्या बाजूस असलेल्या खिडकीतून आणि मग त्यात वेगवेगळ्या रंगाची वर्तुळे आहेत, ती सर्व उठून दिसतात"
"ते चित्र साधेसुधे नाही. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरुन बनलेला एक छोटा ट्रान्समिटर आहे तो, पण कुठल्याही उर्जेविना काम करणारा. त्याच्या आत एक विशेष प्रकारचा पडदा आहे. तुझ्या केबिनमध्ये होणार्या प्रत्येक आवाजाने, तो पडदा कंप पावतो. पडद्याचा हा कंप, अदृश्य अशा लेसर किरणांच्या माध्यमातून टिपता येतो आणि मग त्याचे पुन्हा ध्वनिलहरींमध्ये रूपांतर करता येते. समोरच्या इमारतीतून, अशा प्रकारच्या मानवी डोळ्यांना अदृष्य असणार्या लेसर शलाका, त्या चित्रावर फेकणे अवघड नाही. त्यात त्या काचेच्या खिडकीमुळे त्यांचे काम सोपे झाले आहे. त्या पुन्हा प्राप्त केलेल्या ध्वनिलहरींवर. नंतर वेगवेगळे साऊंड फिल्टर्स वापरले, तर तुझ्या केबिनमध्ये बोलला जाणारा शब्द न शब्द, समोरच्या इमारतीत ऐकला जाऊ शकतो, रेकॉर्ड केला जाऊ शकतो. आणि माझा असा अंदाज आहे, ती फ्रेम हेतूपुरस्सर तुला भेट देण्यात आली आहे" विसुचे बोलणे देशमुखांच्या कानात शिरले आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात अविश्वास ओतप्रोत भरला होता.
"'laser listeners' म्हणून सर्च इंजिनमध्ये शोधलेस तर तू स्वत:देखील माहिती मिळवू शकशील" देशमुखांच्या डोळ्यातला अविश्वास पाहून विसुने अधिक माहिती पुरवली.
"पण यावेळचे टेण्डर तर, मी स्वत:च भरले होते, आणि त्यावर काही चर्चाही नव्हती केली. " देशमुखांचे मन अजूनही या प्रकारावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.
"'तू स्वत: दुसरा फितूर आहेस', असे मी का म्हटले, ते नाही विचारलेस ? " -- विसु
"का ? " -- देशमुखांच्या नकळत, त्यांच्या तोंडातून प्रश्न विचारला गेला.
"का ? " -- देशमुखांच्या नकळत, त्यांच्या तोंडातून प्रश्न विचारला गेला.
"मला ए
क सांग, तू चश्मा वापरत होतास ना पूर्वी ?""हो. पण गेल्या वेळेस नंबर वाढला होता, त्यावेळेस त्या चष्म्याच्या दुकानातील माणसाने, अत्यंत आधुनिक कॉन्टॅक्ट लेन्सेस आल्याचे सांगितले. त्याने या लेन्सेसचे फायदे सांगितले, मला ते आवडले. या लेन्सेस काढाव्या लागत नाहीत, स्वच्छ कराव्या देखील लागत नाहीत आणि दीर्घकाळ टिकतात. म्हणून मग या कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्यास सुरुवात केली." देशमुखांनी डोळ्याचा खालचा भाग बोटाने खेचून विसुला त्या लेन्सेस दाखविण्याचा प्रयत्न केला. "जराही खुपत नाहीत रे. चष्म्यापेक्षा बर्याचच महाग पडल्या, पण मला अधिक स्वच्छ दिसताय तेंव्हापासून."
"गेल्या वेळेस म्हणजे कधी ?" -- विसु
"साधारण चार महिन्यांपूर्वी" -- देशमुख
"तरीच. तुझ्या डोळ्यांना खुपल्या नसतील, पण तुझ्या व्यवसायाला चांगल्याच खुपल्या आहेत या कॉन्टॅक्ट लेन्सेस. तुझ्या डाव्या डोळ्यातील लेन्सच्या, एका कोपर्यात अत्यंत शक्तीशाली कॅमेरा आहे आणि माझा अंदाज चुकत नसेल, तर त्या लेन्सच्या भोवती एक वायरलेस ट्रान्समिटर आहे. त्या ट्रान्समिटरचा वापर करून, तू बघत असलेले प्रत्येक दृश्य, कुठेतरी पाठवले जात आहे, कदाचित तुझ्याच वायफायचा किंवा मोबाईलवरच्या इंटरनेटचा वापर होत असावा. मगाशी मी तुझ्याजवळ, जेंव्हा तो 'बग डिटेक्टर' आणला होता, तेंव्हा त्याने सर्वात अधिक सिग्नल आणि दीर्घ बीप दोनदा दिला, एकदा तुझ्या डाव्या डोळ्याजवळ आणल्यावर आणि दुसरा तुझ्या हातातील अंगठीच्या जवळ आणल्यावर" त्या अंगठीत देखील काहीतरी विशेष असावे असे वाटते आहे. ती पण नुकतीच विकत घेतली आहेस का ?" - विसुने शक्य तितक्या सोप्या भाषेत, देशमुखांना परिस्थितीची कल्पना दिली.
"नाही ती जुनी आहे, पण घट्ट होत होती,म्हणून साधारण दोन महिन्यांपूर्वी, तिचा घेर वाढवायला आणि पॉलिश करायला दिली होती." देशमुखांच्या शब्दाशब्दात विमनस्कता डोकावत होती.
"तुला पद्धतशीरपणे, पुरता घेरलाय त्या न्यू एरावाल्याने. मेहुल नाव आहे ना त्याचं" -- विसु
"तुला पद्धतशीरपणे, पुरता घेरलाय त्या न्यू एरावाल्याने. मेहुल नाव आहे ना त्याचं" -- विसु
थोडा वेळ देशमुख काहीच बोलले नाहीत. मग पडलेल्या खांद्याना सावरत, खोल गेलेल्या आवाजात त्यांनी कबुली दिली. "हो मेहुलच नाव आहे त्याचं. पण आता काय करू म्हणतोस ?"
"ती फ्रेम तिथून काढून टाक, तुझी अंगठी काढून ठेव आणि त्या कॉन्टॅक्ट लेन्सेस एखाद्या डबीत जपून ठेव."
"फेकून देतो ते सगळं" उद्वेगाने देशमुख उत्तरले.
"ती फ्रेम तिथून काढून टाक, तुझी अंगठी काढून ठेव आणि त्या कॉन्टॅक्ट लेन्सेस एखाद्या डबीत जपून ठेव."
"फेकून देतो ते सगळं" उद्वेगाने देशमुख उत्तरले.
"देशमुख, आपण सायबर क्राइम कडे तक्रार करणार आहोत" विसु थोड्या अधिकारवाणीने म्हणाला "ते सर्व जपुन ठेव. तक्रार करताना या गोष्टी आणि त्यांची बिलं लागतील. आणि तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण थोडे स्पष्ट बोलतो. हे सर्व तंत्रज्ञान अतिशय आधुनिक स्वरूपाचे आहे, तू काय किंवा तो न्यू एरावाला मेहुल काय, ही हेरगिरीची साधने तुमच्यासाठी, असल्या क्षुल्लक चोरीसाठी बनलेली नाहीत. माझा अंदाज चुकत नसेल तर तुला आणि कदाचित मेहुलला देखील केवळ एक गिनीपिग म्हणून वापरले गेले आहे, या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी. त्या मेहुलला या गोष्टी कुठून मिळाल्या हे समजायला हवे. कदाचित यामागे एखादे प्रचंड मोठे कारस्थान असावे, कदाचित एखादी देशविघातक संघटना. तेंव्हा पोलिसांना या पूर्ण घटनेची सविस्तर माहिती देणे, हे अत्यंत आवश्यक आहे. माझी गरज भासेल तिथे प्रत्येक ठिकाणी मी असेनच. आणि त्या सुकाळेला वाचविण्याचा प्रयत्न करू नकोस. तो सुकाळे बाराच्या भावात गेला तरी चालेल"
"यस सर" देशमुखांच्या आवाजात थोडा उत्साह आला होता. "तू म्हणशील तसेच करू"
--
त्या नंतरचे चार-पाच दिवस, विसु आणि देशमुखांचे पूर्ण ऑफिस यांच्यासाठी अतिशय धामधुमीचे गेले. त्यांनी पोलिसांना आणि पोलिसांनी त्यांना, पूर्ण सहकार्य केले आणि गुरुवारी संध्याकाळी मेहुलला अटक झाल्याची बातमी विसुला मिळाली.
तरीही शुक्रवारी संध्याकाळी, पुन्हा देशमुखांचा फोन पाहिल्यावर, विसुच्या मनावर काहीसा ताण आला. काहीशा अस्वस्थ मनाने त्याने तो कॉल स्वीकारला.
"यावेळेचे कॉंट्रॅक्ट आपल्याला मिळाले." देशमुखांच्या आवाजात आनंद मावत नव्हता.
"आपल्याला ?" -- विसु
"होय आपल्यालाच. यापुढे प्रत्येक वर्षी DEPL च्या नेट प्रॉफिटमधले, दहा टक्के तुला मिळतील. थोड्या वेळात तसे अधिकृत पत्र मिळेल तुला. आणि येत्या रविवारी सकाळी घरगुतीमध्ये जातोय आपण, बूक केलंय मी पार्टीसाठी. तुझ्या आणि माझ्या दोघांच्या ऑफिस स्टाफला एकत्र एन्जॉय करूं दे आपल्याबरोबर."
"आपल्याला ?" -- विसु
"होय आपल्यालाच. यापुढे प्रत्येक वर्षी DEPL च्या नेट प्रॉफिटमधले, दहा टक्के तुला मिळतील. थोड्या वेळात तसे अधिकृत पत्र मिळेल तुला. आणि येत्या रविवारी सकाळी घरगुतीमध्ये जातोय आपण, बूक केलंय मी पार्टीसाठी. तुझ्या आणि माझ्या दोघांच्या ऑफिस स्टाफला एकत्र एन्जॉय करूं दे आपल्याबरोबर."
देशमुखांच्या आवाजातला उत्साह आणि केस सुटल्याचे समाधान, या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित, पण कितीतरी दिवसांनी विसुच्या तोंडातून शीळ वाजली.
======
समाप्त
======
समाप्त
======
======
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा