वरील चार मांडणींपैकी
पहिल्या मांडणीतील विश्वे काळाच्या शाखांनी विभाजित होतात,
दुसर्या मांडणीत अतिविशाल अंतरामुळे,
तिसर्या मांडणीत बाह्यविश्वात त्या समांतर विश्वांचे स्वतंत्र अस्तित्व आहे
तर चौथ्या मांडणीत संपूर्णपणे वेगळ्या गणिती संरचनेमुळे ती परस्परांना समांतरआहेत.
प्रत्येक प्रकारच्या समांतर विश्वांचे कारण वेगळे असल्यामुळे या विश्वांचा परस्परांशी कोणत्या प्रकारे संपर्क होऊ शकेल किंवा कोणत्या प्रकारे ती शोधली जाऊ शकतात, सिद्ध होऊ शकतात याबाबतच्या धारणादेखील वेगळ्या आहेत. कागदावर अत्यंत आकर्षक वाटणार्या या संकल्पनांची प्रत्यक्ष अस्तित्वात असण्याच्या शक्यतेस दुजोरा देणारे किती घटक सध्याच्या प्रस्थापित विज्ञानात आहेत ?
कुठलीही 'अनोळखी' गोष्ट शोधण्याची विज्ञानाची क्षमता बर्याच काळापासून विद्युतचुंबकीय प्रारणांपुरतीच (ElectroMagnetic Radiation) मर्यादित होती. (यात दृश्य प्रकाश, क्ष किरणे, गॅमा किरणे आणि इतर सर्व प्रकारच्या लहरी येतात.) नुकतेच गुरुत्वाकर्षण लहरींचे अस्तित्व जेंव्हा सिद्ध झाले त्यावेळी (कदाचित) या क्षमतेच्या पलीकडचे ठरू शकेल, असे काही मानवाने साध्य केले आहे. डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि तत्सम काही अन्य गोष्टी आपल्यासाठी अजूनही गूढ आहेत.
----
पहिल्या मांडणीतील समांतर विश्वे ही काळाच्या शाखांनी विभाजित आहेत, याचाच दुसरा अर्थ असा होतो की या समांतर विश्वांना शोधण्यासाठी वा त्यांचा प्रत्यय येण्यासाठी वा त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काळ म्हणजे नक्की काय आहे ? काळ स्वयंचलित असण्याचे कारण काय ? काळ अपरिवर्तनीय आहे की नाही ? काळ एकशाखीय आहे की बहुशाखीय ? यासारख्या अनेक गोष्टींचा आपल्याला उलगडा करावा लागेल.
काळाची जाणीव, काळाचे ज्ञान आपल्याला ज्या प्रकारे होते किंवा ज्या प्रकारे आपण काळाचे विश्लेषण करतो तो प्रकार मानवी मेंदूतील Cerebral cortex या भागाशी निगडीत आहे असे सध्याचा अभ्यास सांगतो. या भागाला इजा पोहोचल्यास काळाचे भान हरविण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. थोडक्यात आपल्या काळासंबंधीच्या जाणीवा अधिक विकसित व्हायला हव्या असतील, काळाच्या प्रत्यक्ष स्वरूपाचे यथार्थ ज्ञान आपल्याला व्हायला हवे असेल तर त्याचा एक मार्ग आपल्या मेंदूतील या भागाच्या अधिक विकसित होण्याशी संबंधित आहे. आता त्यासाठी ध्यानधारणेचा, योगमार्गाचा पथ निवडायचा की Genetic Engineering चा हा वरवर पाहता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र हा प्रश्न अखिल मानवजातीच्या स्तरावर सोडवायचा असेल (आणि तो तसा कधी ना कधी सोडवावा लागेल), तर विज्ञानाला घ्यावी लागणारी झेप ही बर्यापैकी मोठी असेल कारण आजही आपले मानवी मेंदूसंबंधीचे ज्ञान बर्यापैकी मर्यादित आहे. हे ज्ञान वाढविण्यासाठी अत्यंत सखोल (क्वचित वैज्ञानिक चौकटीबाहेरचा) अभ्यास करण्याची तयारी आपल्याला दाखवावी लागेल. इतर पशूंना, प्राण्यांना, पक्ष्यांना काळाचे भान कसे आहे याचा अभ्यासदेखील या दरम्यान होणे आवश्यक ठरावे. उदा एखादी दुर्घटना घडायच्या आधी (किंवा काही ठराविक जागांवर) काही विशिष्ट प्राणीसमूह अस्वस्थ का होतात ? त्यांना याची जाणीव नक्की कशाप्रकारे होते ? हे प्रश्न आपल्याला मूळातून सोडवावे लागतील आणि मग त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे ठरवावे लागेल.
काळाच्या संदर्भात आत्तापर्यंत झालेले प्रत्यक्ष प्रयोग हे कणभौतिकी स्तरावरचे आहेत किंवा Thought experiement या प्रकारचे आहेत. या दोन्ही प्रकारच्या प्रयोगांची स्थूल जगाशी प्रत्यक्ष सांगड घालणे हे सोपे नाही, त्यामुळे सध्याच्या वैज्ञानिक चौकटीत झालेले काळाचे ज्ञान मिळवण्याचे हे प्रयोग, प्रचीतीच्या दृष्टिकोनातून असंभवनीयतेच्या सीमेवरचे आहेत. याचाच दुसरा अर्थ असा होतो की सध्याच्या संदर्भ चौकटीच्या बाहेर जाऊन आपण निरीक्षण करू शकलो तर कदाचित आपल्याला वेगळ्या प्रकाराने काळाचे ज्ञान होऊ शकेल.
----
----
दुसर्या मांडणीतील विश्वे प्रचंड मोठ्या (आणि सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आवाक्याबाहेरच्या) अंतरामुळे विभाजित असल्यामुळे, या विश्वांचा खरेखोटेपणा सिद्ध करणे हे केवळ आणि केवळ त्या अंतरावरील अवकाशप्रवास आणि तिथून पुन्हा पृथ्वीशी संपर्क या माध्यमातूनच साध्य होऊ शकतो. अवकाश यानांचा वेग वाढविण्याचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत आणि कदाचित आणखी काही दशकात आपली अंतराळयाने प्रकाशाच्या २० ते ३० टक्के इतक्या प्रचंड वेगाने अंतराळ प्रवास करू शकतील. मात्र या मांडणीत भाकीत केलेली अंतरे इतकी विशाल आहेत की भविष्यात आपण प्रकाशवेगाने जाण्याची क्षमता जरी प्राप्त केली तरी अब्जावधी (खरंतर त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक) प्रकाशवर्षांची अंतरे पार करणे आणि तिथून पुन्हा पृथ्वीशी संपर्क करणे हे मानवी आयुष्याच्या (अमरत्व साध्य करता येणार नाही हे गृहीत धरून :-) ) मर्यादांच्या सदैव पलीकडे असणार आहे. थोडक्यात त्या अतिदूरच्या प्रदेशात जाऊन तिथून पुन्हा मानवी आयुर्मर्यादेच्या कक्षेत राहून पृथ्वीशी संपर्क करण्यासाठी आपल्याला Wormhole वा तत्सम तंत्रज्ञान साध्य करावेच लागेल. कणभौतिकी शाखेशी संबंधित प्रयोग पृथ्वीवर करून कदाचित आपल्या तंत्रज्ञानाला एक दिशा मिळू शकेल, मात्र स्थूल स्तरावर यासाठी लागणारी यंत्रणा उभारणे वा या नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित स्थूलस्तरावरचे प्रत्यक्ष प्रयोग करणे यासाठी आपल्याला पृथ्वीबाह्य, खरंतर सूर्यमालेच्याही बाहेरील प्रयोगशाळेची आवश्यकता भासेल असे वाटते. आणि त्याचे महत्त्वाचे कारण हेच असेल की अशा प्रयोगांसाठी आवश्यक असणारी ऊर्जा आपल्या सूर्यमालेत उपलब्ध करणे किंवा त्यासाठी पृथ्वीच्या आसपास प्रयोग करणे, पृथ्वीच्या सूरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत त्रासदायक ठरू शकते.
----
----
तिसर्या मांडणीतील विश्वांची प्रचीती घेण्यासाठी आपल्याला पुढीलपैकी प्रत्येक गोष्ट साध्य करणे आवश्यक आहे :
१) त्रिमित मितींपलीकडच्या मितींचे प्रत्यक्ष ज्ञान होणे ,
२) आपल्या मितीतून त्या अनोळखी मितींमध्ये पोहोचणे,
३) तिथे आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आणि
४) तिथून पुन्हा पृथ्वीशी संपर्क प्रस्थापित करणे
आज या संदर्भात आपण पहिल्या टप्प्यावर अडखळत आहोत. या अडखळत्या सुरुवातीची बीजे String Theory त आहेत.
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे नियम वैश्विक स्तरावर लागू पडत नाहीत हे लक्षात आल्यावर आईनस्टाईनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताने अनेक प्रश्नांची, त्यातील त्रुटींची उकल करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, पण कालांतराने व्यापक सापेक्षता सिद्धांतातील संभाव्य त्रुटी उघड होऊ लागल्या. त्यातील एक मुख्य त्रुटी स्थूल स्तरावरचा व्यापक सापेक्षता सिद्धांत आणि सूक्ष्म स्तरावरच्या कणभौतिकीचे प्रस्थापित सिद्धांत यांच्या एकत्रीकरणाशी, त्या दोन्ही सिद्धांताना एकाच छत्राखाली आणण्याच्या (Theory of Everything) प्रयत्नांशी संबंधित होती. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आईनस्टाईनने यासाठी बरेच प्रयत्न केले असे सांगण्यात येते, ज्यात आपल्या दुर्दैवाने त्याला यश लाभले नाही. या एकत्रीकरणाच्या पहिल्या टप्प्यावरचे String Theory हे एक अडखळते पाऊल आहे. अडखळते अशासाठी की ते आजही केवळ गणिती स्तरावर आणि अर्थातच कागदावर आहे. दुसर्या शब्दात सांगायचे तर सध्यातरी String Theory ही परिकल्पना (परीकल्पना नव्हे :-) ) किंवा गृहीतप्रमेय (Hypothesis) आहे, सिद्धांत नव्हे.
आपण जेंव्हा कणभौतिकी किंवा पुंजभौतिकी असे म्हणतो, तेंव्हा त्यातून ध्वनित होणारी स्वाभाविक गोष्ट ही आहे की मूलकण हे कणस्वरूपात किंवा ऊर्जेच्या पुंज (सूक्ष्म गुच्छ) स्वरूपात आहेत. String Theory या धारणेस नाकारते. String Theory च्या गृहीतकानुसार सर्व मूलकण अतिसूक्ष्म आकाराचे आणि उर्जेपासून बनलेले धागे (रज्जु) आहेत. अतिसूक्ष्मस्तरावर विचार करता, बिंदूसम आणि शून्यमितीय म्हणता येतील अशा मूलकणांकडून, एकमितीय म्हणता येईल अशा रज्जुस्तरावर होणारे हे सैद्धांतिक स्थित्यंतर आहे. हे धागे किती सूक्ष्म आहेत याचा केवळ अंदाज म्हणून उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की अणूचा आकार आपण सूर्यमालेच्या विस्ताराइतका मानला तर या धाग्याचा आकार हा पृथ्वीवरील एखाद्या झाडाप्रमाणे आहे. हे धागे सतत कंपन पावत असतात आणि त्यांच्या कंपनातील विविधतेमुळे, विविध प्रकारचे मूलकण तयार होतात अशी String Theory ची धारणा आहे. String Theory च्या किमान तीन महत्त्वाच्या आवृत्ती आहेत (त्यातही अनेक पोटभेद आहेत ते वेगळेच) ; Bosonic Superstring theory (२६ मिती), Superstring theory (१० मिती) आणि M-Theory (११ मिती). हा विषय अत्यंत क्लिष्ट आहे, स्वतंत्र लेखमालेचा आहे, त्यामुळे जास्त खोलात न जाता Superstring theory मध्ये दहा मिती कशा कल्पिल्या आहेत त्या प्रत्येकी दोन-तीन वाक्यात जरी मांडले तरी याची प्रचीती घेणे किती अवघड आहे ते लक्षात येऊ शकेल.
आपल्या विश्वातील लांबी, रुंदी , उंची (किंवा खोली) आणि काळ या चार मितींपलीकडे इथे आणखी सहा मिती कल्पिल्या आहेत.
पंचमित विश्व ) या मितीमध्ये आपल्या 'चतुर्मितीय' विश्वाशी पहिली फारकत घेतली जाईल आणि ती कदाचित आपल्या विश्वातील विविध भौमितिय संरचनेशी संबंधित असेल. या मितीमध्ये आरंभीची स्थिती समान असूनही वेगळ्या भौमितिय संरचनांमुळे काही काळाने ही विश्वे वेगळ्या कालपथावर जातील.
षड्मित विश्व) या मितीमध्ये पंचमितीय विश्वे आपल्याला एका पंचमितीय प्रतलात अनुभवास येतील. त्यामुळे या मितीत जाणे साध्य झाल्यास कदाचित आपल्याला एका विश्वातून दुसर्या समांतर विश्वात जाणे सहज शक्य होईल.
सप्तमित विश्व) या मितीमध्ये असणार्या अनेक विश्वांची आरंभीची परिस्थिती वेगळी असेल आणि षड्मित विश्वाचे सर्व गुणधर्म देखील त्यात असतील. यांच्या आरंभापासूनच ही विश्वे आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या घटनांनी आणि काळाने बद्ध असतील.
अष्टमित विश्व) या मितीमध्ये सप्तमितीतील अनेक विश्वे अष्टमितीमधल्या प्रतलात अस्तित्वात असतील. त्यामुळे येथे विविध सप्तमित विश्वात परस्पर संपर्क होऊ शकेल.
नवमित विश्व) या मितीमध्ये अष्टमित विश्वातील सर्व गुणधर्म असतीलच , शिवाय येथील भौतिक नियम सुद्धा आपल्या विश्वापेक्षा भिन्न असतील. वेगळी आरंभस्थिती, वेगळे स्थिरांक, वेगळे भौतिक नियम, वेगळ्या संरचना यामुळे इथे स्थळकाळाची सर्व 'combinations' घडू शकतील.
दशमित विश्व) नवमित प्रतलात असणारी ही विश्वे सर्व संभव घटकांच्या आधारांवर आपापले वेगळे अस्तित्व जपून असतील. आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेले हे जग असेल.
वर दिलेल्या यादीतील विश्वातील विविधता आणि गुंतागुंत लक्षात घेतली की सुरूवातीस दिलेल्या चार गोष्टींची प्रचीती घेण्यासाठी आपली बुद्धी, आपल्याकडे असलेले ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान किती तोकडे आहे आणि आपल्याला किती मोठा पल्ला अजून गाठायचा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता पडू नये.
----
----
शेवटच्या मांडणीतील विश्वे ही संपूर्णपणे वेगळ्या गणिती संरचनेवर आधारित असतील ही गोष्ट मान्य केल्यास आशा विश्वांची प्रचीती घेणे बहुदा आपल्याला कधीच शक्य होणार नाही हे स्विकारणे आपल्याला जड जाऊ नये. ही विश्वे आपल्यासाठी अप्राप्य आहेत आणि यदाकदाचित अप्राप्याचे केवळ निरीक्षण करण्याचा काही मार्ग असेलच, तर त्यासाठी मानवजातीत इतक्या टोकाची उत्क्रांती घडून यावी लागेल की त्यानंतर जी प्रजाती अस्तित्वात येईल तिला मानव म्हणणे शक्यच नसेल. आधीच्या एका लेखांकात म्हटल्याप्रमाणे आपले प्रत्येक विज्ञान हे गणितात व्यक्त होते आणि 'गणितवृक्षाच्या' अनंत शाखांपैकी एक शाखा आपल्या गणिती संरचनेची आहे. या शाखेवर उभे राहून, दुसर्या शाखेवरचे विश्व कसे असेल किंवा दुसर्या शाखेतील गणित कसे असेल याचे निदान करण्याचा, कल्पना करण्याचा कोणताही मार्ग आपल्या गणितीय संरचनेतून निघू शकेल ही शक्यता शून्य आहे.

एक विज्ञान कथा आठवली
उत्तर द्याहटवालेखक आठवत नाही....जयंत नारळीकर बाळ फोंडके किंवा निरंजन घाटे असावेत
दुसऱ्या समांतर विश्वात एखाद्या व्यक्तीचा प्रवेश अनेक कथांमधून आला असेल
पण या कथेत, टेलिफोन लायनीतील बिघाडामुळे दोन समांतर विश्वातील व्यक्तींचे फोन लागतातणि प्रेम फुलतं.
पण दोन दिवसानी टेलिफोन लाईन दुरुस्त होते आणि प्रेमाचा चटका लावणारा शेवट होतो
नक्की वाचा
तुमची टिप्पणी आत्ता पाहिली.
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
कथेचे नाव कळले तर शोधायला सोपे जाईल.