प्रसिद्ध वैज्ञानिक, Carl Sagan यांनी एका मुलाखतीत, कालमापनासंबंधी आपल्या स्मृती-पुराणात असलेल्या गणिताचे कौतुक केले आहे. ते म्हणतात :
But the main reason that we oriented this episode of COSMOS towards India is because of that wonderful aspect of Hindu cosmology which first of all gives a time-scale for the Earth and the universe -- a time-scale which is consonant with that of modern scientific cosmology. We know that the Earth is about 4.6 billion years old, and the cosmos, or at least its present incarnation, is something like 10 or 20 billion years old. The Hindu tradition has a day and night of Brahma in this range, somewhere in the region of 8.4 billion years.
As far as I know. It is the only ancient religious tradition on the Earth which talks about the right time-scale. We want to get across the concept of the right time-scale, and to show that it is not unnatural. In the West, people have the sense that what is natural is for the universe to be a few thousand years old, and that billions is indwelling, and no one can understand it. The Hindu concept is very clear. Here is a great world culture which has always talked about billions of years.
Finally, the many billion year time-scale of Hindu cosmology is not the entire history of the universe, but just the day and night of Brahma, and there is the idea of an infinite cycle of births and deaths and an infinite number of universes, each with its own gods.
पण आपल्या पुरातन कालगणनेचे गणित, विश्वाच्या आधुनिक कालमापनाशी किती जुळते ? सर्वसाधारणत: पंचागात या कालमापनेचे गणित दिलेले असते. अनेकांना हे गणित माहीत आहे, पण या लेखात आवश्यक वाटले म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती करत आहे.
(इथे एकम, दशम, शत, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, मध्य, अंत्य, जलधि, परार्ध ही अंकगणना विचारात घेतली आहे.)
ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे.
ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसात (दिन) १४ मन्वंतरे होतात. प्रत्येक मन्वंतराचा मनु, म्हणजे आद्यपुरुष वेगळा. प्रत्येक दिवसाइतकीच ब्रह्मदेवाची रात्र असते.
प्रत्येक मन्वंतरानंतर प्रलय होतो आणि काही अपवाद वगळता जीवसृष्टी नष्ट होते. जीवसृष्टीचा नव्याने आरंभ होतो. हा प्रलयकाळ कृतयुगाएवढा असतो. थोडक्यात चौदा मन्वंतरासोबत, कृतयुगाएवढे चौदा संधिकाल असतात.
या व्यतिरिक्त चौदाव्या मन्वंतरानंतर आणखी एक कृतयुगाइतकाच संधिकाल असतो.
प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे होतात.
प्रत्येक महायुगात चार युगे असतात. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग. ही युगे याच क्रमाने प्रत्येक महायुगात येतात (या संदर्भात मतभिन्नता आहे)
यातील प्रत्येक युगाच्या आरंभी त्या युगाच्या वर्षांच्या एक दशांश इतका संधिकाल असतो. युगाच्या आधी येणार्या संधिकालास उपसंधि व नंतर येणार्या संधिकालास प्रतिसंधि म्हणतात.
कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग यांची वर्षे अनुक्रमे ४०००, ३०००, २००० व १०००. पण ही दिव्यवर्षे आहेत (याबाबत मतभिन्नता आहे) . एक दिव्यवर्ष (देवांचे वर्ष) म्हणजे मानवी ३६० वर्षे.
त्यामुळे एका महायुगाचे गणित पुढीलप्रमाणे :
कृतउपसंधि : ४,०००/१० = ४०० दिव्यवर्षे = १,४४,००० मानवी वर्षे
कृतयुग : ४००० दिव्यवर्षे = १४,४०,००० मानवी वर्षे
कृतप्रतिसंधि : ४,०००/१० = ४०० दिव्यवर्षे = १,४४,००० मानवी वर्षे
त्रेताउपसंधि : ३०००/१० = ३०० दिव्यवर्षे = १,०८,००० मानवी वर्षे
त्रेतायुग : ३००० दिव्यवर्षे = १०,८०,००० मानवी वर्षे
त्रेताप्रतिसंधि : ३,०००/१० = ३०० दिव्यवर्षे = १,०८,००० मानवी वर्षे
द्वापारउपसंधि : २०००/१० = २०० दिव्यवर्षे = ७२,००० मानवी वर्षे
द्वापारयुग : २००० दिव्यवर्षे = ७,२०,००० मानवी वर्षे
द्वापारप्रतिसंधि : २,०००/१० = २०० दिव्यवर्षे = ७२,००० मानवी वर्षे
कलिउपसंधि : १०००/१० = १०० दिव्यवर्षे = ३६,००० मानवी वर्षे
कलियुग : १००० दिव्यवर्षे = ३,६०,००० मानवी वर्षे
कलिप्रतिसंधि : १,०००/१० = १०० दिव्यवर्षे = ३६,००० मानवी वर्षे
वरील गणित लक्षात घेतल्यावर :
कृतयुगाची एकूण वर्षे = ४,८०० दिव्यवर्षे = १७,२८,००० मानवी वर्षे
त्रेतायुगाची एकूण वर्षे = ३,६०० दिव्यवर्षे = १२,९६,००० मानवी वर्षे
द्वापारयुगाची एकूण वर्षे = २,४०० दिव्यवर्षे = ८,६४,००० मानवी वर्षे
कलियुगाची एकूण वर्षे = १,२०० दिव्यवर्षे = ४,३२,००० मानवी वर्षे
या सर्वांची बेरीज केल्यावर एका महायुगाची वर्षे = १२,००० दिव्यवर्षे = ४३,२०,००० मानवी वर्षे
एका मन्वंतरात ७१ महायुगे म्हणजे एका मन्वंतरात ७१ x ४३,२०,००० मानवी वर्षे = ३०,६७,२०,००० मानवी वर्षे. अर्थात तीस कोटी, सदुसष्ट लक्ष, वीस हजार मानवी वर्षे.
प्रत्येक मन्वंतरानंतर कृतयुगाइतका प्रलयकाल अर्थात १७,२८,००० मानवी वर्षांचा प्रलयकाल.
म्हणजेच प्रत्येक मन्वंतर + मन्वंतरसंधिकाल मिळून ३०,८४,४८,००० मानवी वर्षे होतात. अर्थात तीस कोटी, चौर्याऐंशी लक्ष, अठ्ठेचाळीस हजार मानवी वर्षे.
अशी १४ मन्वंतरे म्हणजे ३०,८४,४८,००० x १४ = ४,३१,८२,७२,००० मानवी वर्षे. अर्थात चार अब्ज, एकतीस कोटी, ब्याऐंशी लक्ष, बहात्तर हजार मानवी वर्षे.
या व्यतिरिक्त जो पंधरावा कृतयुगाइतका संधिकाल असतो त्याचे मान १७,२८,००० मानवी वर्षे
या दोघांची बेरीज करता ब्रह्मदेवाच्या एका दिवसात (दिन) ४,३२,००,००,००० मानवी वर्षे होतात. (१००० महायुगांइतका काळ). अर्थात चार अब्ज बत्तीस कोटी मानवी वर्षे. याला ब्रह्मकल्प किंवा कल्प अशी संज्ञा आहे.
या इतकीच ब्रह्मदेवाची रात्र असते. या रात्रीत महाप्रलय होतो आणि सर्व विश्व शून्यवत होते. ब्रह्मदेव दुसर्या दिवशी उठून पुन्हा सृष्टीनिर्माणाला सुरुवात करतो.
त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका दिवसरात्रीत ८,६४,००,००,००० मानवी वर्षे होतात. आठ अब्ज चौसष्ट कोटी मानवी वर्षे. (Carl Sagan ने उल्लेख केलेले हेच ते मापन. )
ब्रह्मदेवाच्या एका वर्षात ३६० दिवस असतात. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका वर्षात
३६० x ८,६४,००,००,००० = ३,१,१,०,४०,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ महापद्म, १ निखर्व, १ खर्व, ४० कोटी मानवी वर्षे. अर्थात 3.1104 ट्रिलियन मानवी वर्षे.
त्यामुळे ब्रह्मदेवाच्या १०० वर्षांच्या आयुष्यात ३,१,१,०,४,०,००,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ अंत्य, १ शंकू, १ महापद्म, ० निखर्व, ४ खर्व मानवी वर्षे. अर्थात 311.04 ट्रिलियन मानवी वर्षे किंवा ३१,१०४ खर्व मानवी वर्षे.
--
ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर, दुसरा ब्रह्मदेव निर्माण होण्यापूर्वी आणखी १०० ब्रह्मवर्षे (अर्थात ३,१,१,०,४,०,००,००,००,००,००० मानवी वर्षे अर्थात 31104 ट्रिलियन मानवी वर्षे किंवा ३१,१०४ महापद्म मानवी वर्षे. ) इतका काळ ब्रह्मदेवाविना जातो. !
--
विश्वाच्या वयासंदर्भातील हे गणित, पहिल्या लेखांकात नमूद केलेल्या आधुनिक विज्ञानाच्या अनुमानांच्या स्तरावर जाते, पण जुळत मात्र नाही. या दोन्हीची तुलना पुढल्या लेखांकात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा