चंद्रावरची एखादी कुंडली आजच प्रत्यक्षात मांडता येईल का ?
अपोलो - ११ हे अंतराळयानाने १६ जुलै १९६९ रोजी, ०९:३२ EDT (अर्थात १३:३२ UTC) वाजता चंद्रावर जाण्यासाठी केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा, अमेरिका इथून उड्डाण केले. (फ्लोरिडातील वेळेनुसारची कुंडली सोबत जोडली आहे).
२० जुलै १९६९ रोजी २०:१७:४० UTC (अर्थात फ्लोरिडा वेळेनुसार १६:१७:४० EDT) (२१ जुलै १९६९, ०१:४०:१७, मुंबई) वाजता अपोलो - ११ चंद्रावर उतरले (फ्लोरिडातील वेळेनुसारची कुंडली सोबत जोडली आहे).
२० जुलै १९६९ रोजी ०२:५६:१५ UTC (अर्थात फ्लोरिडा वेळेनुसार २२:५६:१५ EDT) वाजता नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले.
अपोलो - ११ चंद्रावर उतरणे आणि नंतर मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवणे ह्या दोन्ही घटना, पृथ्वी व चंद्र ह्या दोन्ही गोलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना आहेत.
अर्थात ह्या घटनांची चंद्रकेंद्रीत पद्धतीने कुंडली मांडता आली तर ती फलिताच्या दृष्टीने बोलकी हवी.
अपोलो - ११ जिथे व जेंव्हा उतरले होते त्यावेळेस चंद्रावर उतरले त्यावेळेस Stellarium ह्या सॉफ्टवेअरमधील चित्र पाहा. (हे दृश्य कसे काढले ते ह्याच लेखांकाच्या तळाशी अवांतरमध्ये दिले आहे)
पूर्वक्षितिजावर पुष्य नक्षत्र उदित झाले आहे. अर्थात तिथे कर्क लग्न आहे.
ह्या चित्रात M44 हा तारकागुच्छ पूर्वक्षितिजावर आहे आणि त्याचे Ecliptic Longitude १२७॰ १२' ६.३" असे दाखविले आहे.
तेच लग्न आहे असे समजून अपोलो - ११ च्या चंद्रावतरणाची त्या स्थानाची चंद्रकेंद्रीत कुंडली आपण मांडू शकतो.
त्यामुळे पृथ्वीनिष्ठ अयनांश विचारात घेतल्यास १२७॰ १२' ६.३०" - २३॰ २४' ५९.०४" = १०३॰ ४८' ०७.२६"
अर्थात कर्क लग्न १३॰ ४८' ७.२६"
चंद्रावरील भावसाधनाचे तक्ते उपलब्ध नसल्याने Equal House घेऊन ही कुंडली मांडायला हवी.
आता चंद्रावतरणाच्या फ्लोरिडातील कुंडलीत चंद्र कन्या १४॰ २७' ४६" असल्याने,
ढोबळमानाने चंद्रकेंद्रीत कुंडलीत, पृथ्वी मीन १४॰ २७' ४६" असायला हवी
====
म्हणजेच पहिल्या मानवी चंद्रावतरणाच्या, चंद्रकेंद्रीत कुंडलीत, पृथ्वी भाग्यस्थानी (भाग्यबिंदूजवळ) येते.
आणि पृथ्वीचा नक्षत्रस्वामी शनि असून, तो तिच्याशी द्विर्द्वादशयोगात आहे व दशमात (दशमबिंदूजवळ) आहे.
षष्ठेश, भाग्येश गुरु हा हर्षल ह्या नवमतवादी ग्रहाच्या अंशात्मक युतीत धनस्थानी आहे.
(गुरुचा नक्षत्र स्वामी रवि हा धनेश असून तो तृतीयेश, व्ययेश बुधाच्या युतीत, व्ययात कर्केत आहे; तो प्रवासावर झालेल्या अफाट खर्चाचा निदर्शक मानून, त्याकडे तूर्तास दुर्लक्ष करावे का ? :-) )
दूरचे प्रवास, संशोधन, भाग्योदय आदि गोष्टींशी, भाग्यस्थान निगडीत असल्याने, ह्या चंद्रकेंद्रीत कुंडलीतील पृथ्वीची स्थिती, फलिताशी संबंधित तर्काला धरून आहे.
थोडक्यात ह्या चंद्रकेंद्रीत कुंडलीची साक्ष काढत, मानवी चंद्रावतरणामुळे चंद्राचे भाग्यच उजळले असेही आपण म्हणू शकतो :-)
Stellarium मध्ये पृथ्वी पश्चिम आकाशात थोडी उंचावर दिसते. Search Window हा Menu वापरुन व त्यात 'Earth' लिहून व शोधून तुम्ही खात्री करून घेऊ शकता.
तिथे पृथ्वीचे Ecliptic Longitude, ८॰ १०' २५" दाखविले आहे.
म्हणजेच ८॰ १०' २५" - २३॰ २४' ५९.०४" = ३४४॰ ४५' २५.९६"
म्हणजेच पृथ्वी मीन १४॰ ४५' २५.९६"
हे अंश वरील चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या नवमस्थानातील पृथ्वीच्या भोगाशी (मीन १४॰ २७' ४६") बरेचसे जुळतात. जो १७/१८ कलांचा जो फरक पडत आहे, तो चंद्राचे कक्षाप्रतल व पृथ्वीचे कक्षाप्रतल, पराशय, दोन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधील गणितातील फरक आदि सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे असे म्हणता येईल.
(पृथ्वीभ्रमण करत असताना, चंद्र हा अप्रत्यक्षपणे सूर्यभ्रमण देखील करत असतो आणि त्यावेळेस सूर्यमालेच्या प्रतलाचे शीर्षदृष्य (Top View) बघितले असता चंद्रकक्षा कशी दिसेल, ते सोबतच्या एका चित्रात (NOT TO SCALE) दाखविले आहे.)
अर्थात चंद्राच्या पृथ्वीभ्रमणामुळे तयार होणारी ती नक्षी, इतकी मोठी अजिबात नसेल.
तसेच सूर्यावर क्लिक केल्यास,
सूर्याचे Ecliptic Longitude, ११८॰ ११' ५७" दाखविले आहे हे दिसेल.
म्हणजेच ११८॰ ११' ५७" - २३॰ २४' ५९.०४" = ९४॰ ४६' ५७.९६"
अर्थात सूर्य कर्क ४॰ ४६' ५७.९६"
हे अंश वरील चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या रवि भोगाशी (कर्क ४॰ २९' ५८.७९) बरेचसे जुळतात. जो साधारण १७ कलांचा जो फरक पडत आहे, तो चंद्राचे कक्षाप्रतल व पृथ्वीचे कक्षाप्रतल, पराशय, दोन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधील गणितातील फरक आदि सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे असे म्हणता येईल.
ह्याच पद्धतीने इतर ग्रहांचे भोग देखील काढता येतील.
====
ह्याच पद्धतीने अपोलो १७ ची चंद्रावतरणाची [११ डिसेंबर १९७२ १९:५४:५७ UTC (अर्थात फ्लोरिडा वेळेनुसार १४:५४:५७ EDT)]
चंद्रकेंद्रीत कुंडली मांडल्यास, त्यातील लग्न वृश्चिक २१॰ ४९' ३" येते.
तसेच ह्या पत्रिकेत पृथ्वी सिंह ३॰ १४' १०.४८" येते, म्हणजे इथेही पृथ्वी भाग्यस्थानात येते.
====
थोडक्यात Stellarium हे सॉफ्टवेअर वापरून, थोडे अधिक कष्ट घेऊन, चंद्रकेंद्रीत कुंडली मांडणे शक्य आहे आणि ती निदान ग्रहसाधनदृष्ट्या बर्यापैकी योग्य आहे, असे म्हणायला हरकत नसावी.
अशा आणखी चंद्रकेंद्रीत कुंडलींचा अभ्यास केल्यानंतर फलिताच्या संदर्भातही पुष्टी देणे व कालांतराने पृथ्वीचे 'फळ', राशी, नक्षत्र स्वामित्व निश्चित करणे शक्य व्हावे.
====
पृथ्वीबाह्य कुंडलीसंदर्भातील इतर काही गोष्टींवर एक दृष्टिक्षेप पुढल्या भागात.
====
==========
थोडेसे अवांतर
==========
अपोलो - ११ जिथे व जेंव्हा उतरले होते त्यावेळेस चंद्रावर उतरले त्यावेळेस Stellarium ह्या सॉफ्टवेअरमधील चित्र कसे तयार केले ?
Stellarium Software सुरू करून, सर्वप्रथम त्यातील वेळ पुढे सरकणे थांबविण्यासाठी तळाच्या पर्यायांमधून त्यातील 'Play' चे बटन क्लिक केले. त्यामुळे तिथे पॉझ ( || ) चे बटन दिसू लागते.
माझ्याकडील Stellarium मध्ये मुंबई हे Default Location आहे, त्यामुळे सर्वप्रथम चंद्रावतरणाची मुंबईनुसार दिनांक व वेळ (२१ जुलै १९६९ ०१:४७:४०), Date/Time Window ह्या पर्यायातून मी Stellarium मध्ये नोंदविली.
त्यानंतर मी लोकेशनच्या पर्यायांमध्ये जाऊन, 'Planet' ह्या dropdown मधून, पृथ्वीऐवजी चंद्र हा ग्रह घेतला.
तत्क्षणी वेळ बदलून ०१:४७:४० ऐवजी ०१:४८:१९ अशी झाली. (क्रांतीवृत्त व चंद्राच्या सूर्याभोवतीच्या अप्रत्यक्ष भ्रमणामुळे निर्माण होणारे वृत्त ह्यातील अंतरामुळे, पराशयामुळे हा फरक पडत असावा असा माझा अंदाज आहे)
त्यानंतर स्थानांची यादी बदलली व चंद्रावरची स्थाने उपलब्ध झाली, त्यातून मी Apollo 11 चे स्थान निवडले.
त्या स्थानाचे ह्या सॉफ्टवेअरमधील चांद्र-अक्षांश व चांद्र-रेखांश व विकिपीडियाच्या Apollo 11 च्या पानावरील चंद्रावरील अवतरणाचे चांद्र-अक्षांश व चांद्र-रेखांश थोडेसे वेगळे असल्याने, Stellarium मध्ये ते स्थान अंशत: बदलून, मी Apollo 11 Exact Landing ह्या नावाने नवीन स्थान तयार केले.
सर्वात शेवटी 'Sky and Viewing Option' मधील 'Landscape' ह्या पर्यायात जाऊन, पृथ्वीवरचा Landscape बदलून चंद्रावरचा Landscape घेतला (अर्थात हा केवळ कॉस्मेटिक बदल आहे, त्यामुळे तुम्ही 'Zero Location' हा Landscape देखील वापरू शकता)
=======
क्रमश:
=======


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा