.
=============
तीन नियम
=============
म्हणींना कुणीतरी 'अनुभवांच्या खाणी' असे म्हटले आहे; आणि ते शंभर टक्के सत्य आहे. म्हणी काय किंवा वाक्प्रचार काय, बर्याचदा ते अनुभवातूनच आलेले असतात, काळाच्या कसोटीवर टिकलेले असतात. कमी शब्दात व्यक्त होईल, सहज लक्षात राहील, थोडासा नादमय, असा आशय एखाद्या वाक्यात, एक-दोन ओळीत व्यक्त झाला की कालांतराने त्याला म्हणीचे किंवा वाक्प्रचाराचे रुपडे लाभते. हा आशय क्वचित तत्वज्ञानाकडे झुकणारा असतो, अर्थगर्भ असतो, सुभाषिताचे रूप धारण करतो; तर काही वेळा खिल्ली उडविण्यासाठी वापरता येईल, इतका थिल्लरही असतो आणि काही वेळा चक्क एखादा नियम असल्याप्रमाणे अनुभवासही येतो. त्यामुळेच बहुतेकवेळा, स्थळ, काळ आणि परिस्थिती ह्या तीनही प्रांतात त्या आशयाचा, पर्यायाने त्या म्हणीचा वा वाक्प्रचाराचा वावर अतिशय सहजतेने होत राहतो.
रोजच्या आयुष्यात, क्वचित विशिष्ट प्रसंगात, जसा म्हणींचा, वाक्प्रचारांचा अनुभव येऊन, त्यांच्यावर नव्याने मोहोर उमटत राहते, तसेच विज्ञानाच्या क्षेत्रात काही असिद्ध नियमांचा अनुभव अधूनमधून येत राहतो. लौकिक अर्थाने असे नियम सिद्ध न होता देखील, ह्या नियमांची सार्वकालिकता, नित्य नव्याने जाणवत राहते.
------
आपल्याला ज्ञात असलेल्या विज्ञानात व ज्ञात विज्ञानावर, 'विशिष्ट नियमांचा संच' आणि त्यातही 'तीन नियमांचा संच', ह्या संकल्पनेचा एकंदरच मोठा प्रभाव आहे.
न्यूटनचे गतीसंबंधित तीन नियम,
केप्लरचे ग्रहगतीचे तीन नियम,
ऊष्मागतिकीचे (Thermodynamics) तीन नियम,
यंत्रमानवाच्या वागणुकीचे तीन नियम
आदि.
केप्लरचे ग्रहगतीचे तीन नियम,
ऊष्मागतिकीचे (Thermodynamics) तीन नियम,
यंत्रमानवाच्या वागणुकीचे तीन नियम
आदि.
आर्थर सी क्लार्क ह्या जगप्रसिद्ध विज्ञान लेखकाचे असेच तीन नियम प्रसिद्ध आहेत. त्याच्या लिखाणात, साहित्यात, हे नियम विविध ठिकाणी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रूपात आले आहेत, डोकावले आहेत. मूळ नियम अर्थातच इंग्लिशमध्ये आहेत, पण त्यांचा भावानुवाद करायचा झाल्यास तो काहीसा असा असेल :
------
****
****
१) "जेव्हां एखादी प्रथितयश शास्त्रज्ञ असलेली, अनुभवसंपन्न व्यक्ती असे म्हणते की 'हे शक्य आहे', तेव्हां बहुतांश वेळा, त्या शास्त्रज्ञाचे ते प्रतिपादन, सत्य ठरण्याचीच शक्यता असते. तसेच जेव्हां ती शास्त्रज्ञ व्यक्ती असे म्हणते की 'हे अशक्य आहे', तेव्हा ती व्यक्ती बहुतांश वेळा चुकीचीच असते. "
(==> भविष्यकाळात त्या शास्त्रज्ञाचे प्रतिपादन चुकीचे ठरताना दिसते.)
२) "शक्यतेच्या मर्यादा शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्या शक्यतांच्या पलीकडे असलेल्या, अशक्यतेच्या प्रांतात थोडेसे भ्रमण करणे. "
३) "कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान, हे जादूपासून वेगळे करता येत नाही. "
(दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, पुरेसे प्रगत तंत्रज्ञान हे, त्या तंत्रज्ञानाच्या तुलनेने मागास असलेल्या कोणत्याही समूहासाठी, एखाद्या जादूसारखेच [किंवा चमत्कारासारखेच] असते.)
(दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, पुरेसे प्रगत तंत्रज्ञान हे, त्या तंत्रज्ञानाच्या तुलनेने मागास असलेल्या कोणत्याही समूहासाठी, एखाद्या जादूसारखेच [किंवा चमत्कारासारखेच] असते.)
****
------
------
ह्या नियमांबाबत मर्यादित प्रमाणात ऊहापोह झाला आहे. ह्या नियमांचे मूळ धुंडाळण्याचा, त्यांचा प्रवास शोधण्याचा प्रयत्न झाला आहे, तसेच नियमांमागची क्लार्कची भूमिका देखील ह्या ना त्या प्रकारे उलगडण्याचाही प्रयत्न झाला आहे.
------
====
====
नियम क्रमांक १
१) जेव्हां एखादी प्रथितयश शास्त्रज्ञ असलेली, अनुभवसंपन्न व्यक्ती असे म्हणते की 'हे शक्य आहे', तेव्हां बहुतांश वेळा, त्या शास्त्रज्ञाचे ते प्रतिपादन, सत्य ठरण्याचीच शक्यता असते. तसेच जेव्हां ती शास्त्रज्ञ व्यक्ती असे म्हणते की 'हे अशक्य आहे', तेव्हा ती व्यक्ती बहुतांश वेळा चुकीचीच असते. (==> भविष्यकाळात त्या व्यक्तीचे प्रतिपादन चुकीचे ठरताना दिसते.)
१) जेव्हां एखादी प्रथितयश शास्त्रज्ञ असलेली, अनुभवसंपन्न व्यक्ती असे म्हणते की 'हे शक्य आहे', तेव्हां बहुतांश वेळा, त्या शास्त्रज्ञाचे ते प्रतिपादन, सत्य ठरण्याचीच शक्यता असते. तसेच जेव्हां ती शास्त्रज्ञ व्यक्ती असे म्हणते की 'हे अशक्य आहे', तेव्हा ती व्यक्ती बहुतांश वेळा चुकीचीच असते. (==> भविष्यकाळात त्या व्यक्तीचे प्रतिपादन चुकीचे ठरताना दिसते.)
====
नियम क्रमांक एकचे दोन भाग आहेत आणि विज्ञानाच्या आजवरच्या इतिहासाला व्यवस्थित अभ्यासले तर हे ही लक्षात येईल की, हे दोन्ही भाग सातत्याने अनुभवास येत राहिले आहेत.
नियम क्रमांक १ च्या पूर्वार्धात, अध्याहृत असलेली पृच्छा आहे, 'अमुक अमुक गोष्ट शक्य आहे का ?' ही पृच्छा अर्थातच विज्ञानाशी निगडीत आहे; पण त्याच बरोबर ती बऱ्याचअंशी अज्ञाताशी संबंधित आहे.
'अज्ञात विज्ञान' वा 'अज्ञातांचे विज्ञान' हा विज्ञानाचा असा भाग आहे, जो केवळ भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या वैज्ञानिकांनाच नव्हे, तर विज्ञानाशी संबंधित कुठलेही प्रकटीकरण करणाऱ्या सर्व व्यक्तींना सदैव खुणावत असतो.
भविष्यकाळात गम्य होईल, साध्य होईल अशा आज अज्ञात असलेल्या विज्ञानाशी संबंधित कल्पनाचित्रे रंगविणे, हा विज्ञानाशी संबंधित कलाविष्कार करणाऱ्यांचा आवडता छंद आहे. असा विज्ञानप्रेमी कलाकार त्याच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून विज्ञान आणि कला ह्यांची सरमिसळ करत, कल्पनेच्या भराऱ्या मारत जेव्हां व्यक्त होतो; तेव्हां भलेही तो कलाविष्कार विज्ञानाच्या चौकटीबाहेर जात असला वा वैज्ञानिक तथ्यांशी क्वचित फारकत घेत असला, तरीही त्यास मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय लाभत आला आहे.
पण कलाविष्कार म्हणून अशा कल्पनांच्या भराऱ्या मारणे आणि एखाद्या वैज्ञानिकाने त्याला असलेल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर, आज असाध्य असलेली एखादी गोष्ट साध्य आहे अशी शक्यता वर्तविणे ह्यात महदंतर आहे.
वैज्ञानिकाचे उत्तर हे बहुतांश वेळी, ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या सशक्त पायावर, संशोधनांच्या संभाव्य दिशांवर आणि त्याने केलेल्या चिंतनावर विसंबून असते.
त्यामुळेच, नियम क्रमांक १ च्या पूर्वाधात उल्लेख असलेले 'हे शक्य आहे' हे होकारार्थी उत्तर बहुतांशी वेळी प्रत्यक्षात उतरते.
अगदी अर्वाचीन काळापुरती उदाहरणे शोधायची ठरविल्यास, लिओनार्दो दा विंची, जुल्स व्हर्न आदि द्रष्ट्यांसोबतच, काही शतकांपूर्वीच्या कोपर्निकस, ब्रुनो, गॅलिलिओ, न्युटन ह्या वैज्ञनिकांपासून ते अगदी निकटच्या भूतकाळातील आईनस्टाईन, हॉकिंग सारख्या प्रज्ञावंत वैज्ञानिकांपर्यंत, ह्या पूर्वाधातील उत्तराचा अनुभव कधीनाकधी आला आहे.
अगदी विषयवार जरी विचार केला तरीही ह्याची प्रत्यक्षातील उदाहरणे विलक्षण आहेत. काल विस्फारण (Time Dilation), गुरुत्वीय भिंग (Gravitational lense), गुरुत्वाकर्षण लहरी (Gravitational Waves), कृष्णविवरासंबंधीची अनुमाने, (सामान्य) सापेक्षता सिद्धांत (General Theory of Relativity) आदि गोष्टी कालांतराने प्रत्यक्ष अनुभवास आल्या आहेत.
त्यामुळे नियम क्रमांक १ च्या पूर्वार्धाबद्दल फारसा वाद असण्याचे कारण नाही.
------
नियम क्रमांक १ च्या उत्तरार्धाबद्दल तसेच म्हणता येणार नाही.
ह्याची अनेक कारणे आहेत.
ह्याची अनेक कारणे आहेत.
कितीही तर्कशुद्ध विचार करत असले, त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा कशीही असली, तरीही बरेचसे वैज्ञानिक, मनुष्यस्वभावातील अपरिहार्य लक्षणांवर, दोषांवर क्वचितच मात करू शकतात. त्यामुळे वेळप्रसंगी, ते षड्रिपुंच्या आहारी जाणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे.
तत्कालिन ज्ञान व प्रस्थापित धारणा, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, एखाद्या विचारसरणीशी असलेली दृढ निष्ठा, स्वभावातील काही त्रुटी, परिस्थितीजन्य निष्कर्ष वा निर्णय, ह्या व अशा अनेक गोष्टी आहेत, जिथे तर्कशुद्ध विचारसरणी मागे पडते आणि इतर गोष्टी मानवी मनाचा ताबा घेतात, तर्कसंगत दृष्टिकोन, विश्लेषणाची नैसर्गिक प्रवृत्ती इथे सहजपणे मात खाते. ह्यातून आईनस्टाईन आणि हॉकिंग सारखे प्रज्ञावंत देखील सुटू शकलेले नाहीत. 'Spooky action at a distance' आणि 'Higgs Boson Doomsday' ही अनुक्रमे त्याचीच उदाहरणे आहेत.
काही विशिष्ट परिस्थितीत, अशा वैज्ञानिकांचा आणि त्यांच्या समर्थकांचा एक कंपू देखील निर्माण होतो. अशा कंपूच्या तीव्र धारणांमुळे, वर्चस्ववादी भूमिकांमुळे, आधिकारिक स्थानांमुळे , कितीतरी वेगळे दृष्टिकोन (जे कदाचित योग्य असू शकतील, वैज्ञानिक प्रगतीत महत्त्वाचा सहभाग नोंदवू शकतील) मागे पडल्याची उदाहरणे देखील आहेत.
ह्या व्यतिरिक्त, व्यावसायिक, राजकीय हितसंबंध आणि त्या अनुषंगाने असलेले प्रचारगट हे देखील अशा वैज्ञानिकांकडून 'हे अशक्य आहे' प्रकारची उत्तरे वदवून घेत असावेत, अशी शक्यता नाकारता येणार नाही.
'Science advances one funeral at a time' असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक मॅक्स प्लॅंकचे एक विधान आहे. थोडे कठोर असले तरीही ह्या विधानात तथ्य असावे, अशा काही गोष्टी विज्ञानाच्या इतिहासात आढळतात. असे असूनही, हे विधान व्यक्तीस्तरावर न घेता, रुढ झालेल्या वैज्ञानिक धारणा, कल्पनांच्या संदर्भाने घेतले तर अधिक उचित ठरेल.
प्रचलित आणि कालबाह्य होऊ पाहणार्या किंवा भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीत अडसर ठरू शकणार्या जुन्या धारणा, कल्पना लोप पावल्या नाहीत, तर अनेकदा नव्या कल्पनांचा विकास खुंटतो.
'Science advances one funeral at a time' असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक मॅक्स प्लॅंकचे एक विधान आहे. थोडे कठोर असले तरीही ह्या विधानात तथ्य असावे, अशा काही गोष्टी विज्ञानाच्या इतिहासात आढळतात. असे असूनही, हे विधान व्यक्तीस्तरावर न घेता, रुढ झालेल्या वैज्ञानिक धारणा, कल्पनांच्या संदर्भाने घेतले तर अधिक उचित ठरेल.
प्रचलित आणि कालबाह्य होऊ पाहणार्या किंवा भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीत अडसर ठरू शकणार्या जुन्या धारणा, कल्पना लोप पावल्या नाहीत, तर अनेकदा नव्या कल्पनांचा विकास खुंटतो.
'हे अशक्य आहे' ह्या ऐवजी 'हे कसे शक्य होऊ शकेल' किंवा 'अमुक कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कोणत्या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे'; अशा प्रकारच्या चर्चांसाठी आवश्यक पार्श्वभूमीच निर्माण होऊ शकली नाही (किंवा क्वचित, निर्माणच होऊ दिली नाही) , तर ती कल्पना प्रत्यक्षात येण्याची शक्यता अधिकच धूसर होत जाते.
------
ह्या नियमाच्या अनुषंगाने सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आयझॅक आसिमोव्ह ची एक टिप्पणी आहे आणि ती टिप्पणी क्लार्कच्या नियमातून झिरपणार्या मोकळेपणाच्या विरोधात जाऊन, काहीशी 'विज्ञानपोथीनिष्ठ' होत असली, तरीही ती आवर्जून विचारात घेण्यासारखीच आहे. पहिल्या नियमाच्या उत्तरार्धात 'बहुतांश वेळा' अशा अर्थाचा शब्दप्रयोग (original : very probably) वापरला गेला आहे, त्या संदर्भात ही टिप्पणी आहे.
"When, however, the lay public rallies round an idea that is denounced by distinguished but elderly scientists and supports that idea with great fervour and emotion – the distinguished but elderly scientists are then, after all, probably right."
त्या टिप्पणीचा भावानुवाद काहीसा असा होईल :
'तथापि, प्रथितयश आणि अनुभवसंपन्न शास्त्रज्ञांनी मूळातून नाकारलेल्या, त्याज्य मानलेल्या एखाद्या कल्पनेला, सामान्य जनता जर भावनाशील होऊन, उत्कटतेने कवटाळत असेल, पाठिंबा देत असेल, तर अशा वेळेस ते प्रथितयश आणि अनुभवसंपन्न शास्त्रज्ञ, बहुदा योग्य असतात.'
ह्या टिप्पणीत देखील 'बहुदा' हा शब्द वापरला गेला आहे, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे !
------
****
****
====
नियम क्रमांक २
२) शक्यतेच्या मर्यादा शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्या शक्यतांच्या पलीकडे असलेल्या, अशक्यतेच्या प्रांतात थोडेसे भ्रमण करणे.
====
नियम क्रमांक २
२) शक्यतेच्या मर्यादा शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्या शक्यतांच्या पलीकडे असलेल्या, अशक्यतेच्या प्रांतात थोडेसे भ्रमण करणे.
====
हा नियम विज्ञानातील वाङमयीन वा दृकश्राव्य कलाकृती
आणि
ज्ञात वा अज्ञात विज्ञान,
ह्यांच्या परस्परसंबंधावर भाष्य करतो.
आणि
ज्ञात वा अज्ञात विज्ञान,
ह्यांच्या परस्परसंबंधावर भाष्य करतो.
विज्ञानकथा, विज्ञानकादंबर्या, विज्ञानपट आणि विज्ञानमालिका ह्या दीर्घकालीन प्रवासाचा आरंभ बराच जुना आहे. अगदी दुसर्या शतकात त्याची मूळे आढळतात असा दावा केला गेला आहे.
आता आपल्याकडे, अनेकांना विविध कारणांमुळे, पौराणिक कथातील तथ्य आणि आलंकारिक वा अन्य कारणामुळे समाविष्ट झालेले मिथ्य ह्यांची सरमिसळ पचत नाही. अतिशयोक्ती, महिमावर्धन टाळल्यास, प्रक्षिप्त भाग बाजूला सारल्यास अशा कथांमध्ये काही निखळ (विज्ञाननिष्ठ) सत्य असू शकेल ही गोष्ट, त्यांना अपेक्षित असलेले पुरावे न सापडल्याने मान्यच होत नाही. आणि म्हणून असे लोक, अनेक पौराणिक कथांची वर्गवारी कविकल्पना वा काही वेळा चक्क विज्ञानकथा म्हणून करतात; आता हा प्रकार जर विचारात घेतला, तर विज्ञानकथांचा उगम थेट पौराणिक काळातच नेता येईल !!
कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, शृतिका वा मालिका वा अन्य कोणत्याही स्वरूपात विज्ञान कलाकृती असली, तरीही त्या कलाकृतीला, विज्ञानकल्पनांच्या प्रांगणात भरारी मारणे टाळता येत नाही. किंबहुना विज्ञान वाङमयाचा वा दृकश्राव्य माध्यमातील त्याच्या सादरीकरणाचा, तोच मूळ हेतू असतो.
आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खिडकीतून बाहेर डोकाविल्याशिवाय किंवा त्या उंबर्याच्या पलीकडे पाऊल टाकल्याविना, त्या लेखनाला, सादरीकरणाला अपेक्षित यश मिळणे अवघडच असते. पण यशापलीकडेही, हे सादरीकरण बरेच काही देऊन जाते. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्या सादरीकरणात डोकावलेल्या असीम इच्छा. आज ज्ञाताच्या उंबर्यापलीकडे असलेल्या विज्ञानाच्या अविष्कारांना प्रत्यक्षात उतरविण्याची मनीषा. ही मनीषा देखील विज्ञानाच्या आजपर्यंतच्या प्रगतीला काही अंशी उपयुक्त ठरली आहे.
प्रत्यक्षात न उतरलेल्या, पण मनात झिरपलेल्या अशा अनेक वैज्ञानिक कल्पना, संकल्पना ज्ञात विज्ञानाच्या चौकटीच्या मर्यादा स्पष्ट करतातच, पण त्याच सोबत त्या चौकटीबाहेरची आणि पहिल्या नियमात उल्लेखलेली 'हे शक्य आहे' ची चौकट विस्तारायलाही कारणीभूत ठरू शकतात.
एखाद्या विज्ञान कलाकृतीतले, अशक्यतेच्या प्रांतातील हे भ्रमण, जेव्हां ज्ञात विज्ञानाच्या ठोस पायावर उभे असते, तेव्हां त्या कलाकृती अधिक चांगल्या वठण्याची शक्यता वाढते. पण तरीही विज्ञानाचा ठोस पाया आहे म्हणून ती कलाकृती रुक्ष होईल, त्या कलाकृतीची रंजकता कमी होईल असे नव्हे. कलाकृतीची रंजकता ही, प्रामुख्याने कलाकृतीची निर्मिती होत असतानाच्या, हाताळणीवर अधिक अवलंबून असते, ह्याचा प्रत्यय वारंवार आला आहे.
ज्ञात विज्ञानाच्या चौकटीला ओलांडणारे हे भ्रमण,
भविष्यातील अपेक्षित वैज्ञानिक प्रगतीला स्पर्श करणारे असतेच (Back to the Future [trilogy], The Martian, Interstellar, I Robot आदि).
पण काही वेळा ते भ्रमण वैज्ञानिक प्रगतीच्या अनपेक्षित आणि अनवट वाटा चोखाळणारे, आज असाध्य वाटणार्या वाटांवरचे देखील असू शकते (X-Files, Star Trek, Terminator [trilogy], Lucy आदि).
कित्येकदा ते सैद्धांतिक भौतिक शास्त्राच्या कल्पनांना मांडणारे, रुजविणारे असते (Déjà Vu, Predestination, The Butterfly Effect आदि)
आणि
काही वेळा, विज्ञानाच्या प्रगतीचा प्रवास, अंतिमत: तत्त्वज्ञानाच्या प्रांगणातच जाऊन पोहोचणार आहे, हे सुचविणारे देखील असते (Matrix [trilogy], Gattaca, Source Code, The Island)
--
टीप : 2001 A Space Odyssey आणि Rendezvous with Rama चा उल्लेख आणि त्यांची वर्गवारी इथे मी जाणीवपूर्वक टाळली आहे.
--
टीप : 2001 A Space Odyssey आणि Rendezvous with Rama चा उल्लेख आणि त्यांची वर्गवारी इथे मी जाणीवपूर्वक टाळली आहे.
--
अशक्यतेच्या प्रांतातील अशा भ्रमणाला मानवी कल्पनेच्या आणि तत्कालीन स्वीकारार्हतेच्या मर्यादा असतात.
त्या ही पलीकडे गेलेल्या गोष्टींची मग चेष्टा होते, टवाळी होते. ही चेष्टा कधी पौराणिक कथांमधील वैज्ञानिक संदर्भांच्या वाट्याला येते, तर कधी प्रमाणाबाहेर ताणलेल्या Ancient Aliens सारख्या संकल्पनांच्या वाट्याला. अशा वेळेस मग उपलब्ध असलेली तथ्ये देखील मिथ्य वाटू लागतात. मग ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत आणि ज्या गोष्टी आपल्या मनात रुजलेल्या तत्कालीन संदर्भांशी मेळ खात नाहीत, त्यांचे प्रमाणाबाहेर सुलभीकरण केले जाते किंवा त्यांची स्पष्टीकरणासाठी संपूर्ण अतार्किक मांडणी केली जाते. आणि नंतर ती मांडणीच योग्य आहे, अशी हाकाटी इतक्या उच्चरवात वा प्रसिद्धीतंत्र वापरून केली जाते, की त्या चेष्टा होणार्या संकल्पनांच्या समर्थनार्थ उठणारे आवाज हळूहळू क्षीण होत जातात.
प्रस्थापितांच्या वर्चस्वाच्या ह्या स्वाभाविक दोषातून, विज्ञान देखील सुटलेले नाही.
------
****
====
नियम क्रमांक ३
३) कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान, हे जादूपासून वेगळे करता येत नाही.
====
जादू, न उलगडणारे चमत्कार, स्पष्टीकरण न सापडलेल्या घटना, अद्भुताच्या प्रांतातच शक्य होऊ शकतील अशा अनेक गोष्टी, ह्या मानवी इतिहासाचा आणि वर्तमानाचाही अविभाज्य भाग आहेत.
ह्या तथाकथित चमत्कारांमागे त्यावेळी (आणि क्वचित आजही) न उमगलेले, न उलगडलेले विज्ञानच असते, असे ठामपणे प्रतिपादन करण्यासारखी परिस्थिती निश्चितच आहे. पण चमत्कार, जादू हे तसेच राहावेत अशी एका मोठ्या वर्गाची इच्छा असते. त्या मागे असतात स्वार्थाने परिप्लुत झालेले हितसंबंध व लपविलेली, मूक ठेवलेली आर्थिक, सामाजिक कारणे.
अर्थात काही व्यक्तींनी केलेले 'चमत्कार' वास्तविक अर्थाने, निखळ सत्यही असू शकतात. क्वचित प्रसंगी असे चमत्कार, वैज्ञानिक निरीक्षणांखाली होऊनही, विज्ञानास त्यातील तथ्य, त्यामागचे अज्ञात विज्ञान पूर्णपणे उलगडणे शक्य होत नाही, ह्याची मोजकी उदाहरणे आहेत. चमत्कार करणार्या व्यक्तीस दैवजात वा त्याच्या उपासनेमुळे वा गुरुच्या अनुग्रहामुळे लाभलेल्या काही सिद्धींचा त्यामध्ये वाटा असतो.
सिद्धी म्हणजे तर शेवटी काय ? तर आज अज्ञात असलेल्या विज्ञानाच्या माध्यमातून गवसलेली विलक्षण शक्ती.
मानवी मनात विलक्षण शक्ती आहे आणि त्याचा अनुभव वारंवार आला आहे. संमोहन विद्या (Hypnotism), दूरसंवेदना (Telepathy), पराचलन (Telekinesis) आदिंचे प्रयोग वैज्ञानिक निरीक्षणाखाली झाले आहेत आणि ते हातचलाखी वा फसवणूक म्हणून नाकारता येत नाहीत. दुसर्या शब्दात सांगायचे तर दिव्यत्वाच्या वर्तुळात सामावणार्या, मनाच्या शक्तींचे हे व अन्य प्रयोग, अंतिमत: काही सिद्धींच्या माध्यमातूनच प्रत्यक्षात उतरतात. अशा वेळेस 'दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती' हे म्हणणे किंवा तदनुषंगिक कृती करणे म्हणजे प्रतिगामित्व किंवा अंधश्रद्धा नव्हे हे तथाकथित पुरोगामी आणि 'अंधाश्रद्ध' (आंधळी अश्रद्धा असणारे) व्यक्तींनी लक्षात घेतले तर, अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदू श्रद्धांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न, काही प्रमाणात तरी कमी होऊ शकतील. स्वाभाविकच विनाकारण होणारे काही संघर्षही टळतील.
------
आणि तरीही कर्मठ विज्ञाननिष्ठ होऊन ज्ञात विज्ञानाच्या चौकटीतच विचार करायचा झाल्यास, पुढील प्रसंगाचा अवश्य विचार करावा.
एरिक वॉन डॅनिकनच्या काही पुस्तकात एका कल्पित प्रसंगाचा उल्लेख, वेगवेगळी रुपे घेत आला आहे.
अत्यंत प्रगत झालेल्या पृथ्वीवरील एक अंतराळ मोहिम, एका पृथ्वीसदृश ग्रहावर जाऊन ठेपते. ह्या ग्रहावर जेव्हां अंतराळवीर उतरतात तेव्हां त्यांना असे आढळते की तिथे एक अत्यंत अप्रगत मानवसदृश प्रजाती वास करून आहे. ते अंतराळवीर ह्या प्रजातीत वावरतात. त्या प्रजातीला, आवश्यक असल्यास त्यातील निवडक लोकांना विविध संस्कृतींचे, शास्त्रांचे, शस्त्रांचे, विज्ञानाचे आवश्यक तितकेच ज्ञान टप्प्याटप्प्याने देत राहतात. वेळप्रसंगी त्यांच्यातील स्त्रियांशी शरीरसंबध ठेवून संकरित आणि अधिक बलवान, बुद्धिमान संततीही जन्मास घालतात. ह्या व अशा अनेक गोष्टी साधत, त्या प्रजातीचा सांस्कृतिक, वैज्ञानिक उत्क्रांतीच्या वाटेवरचा प्रवास घडविला जातो.
कालांतराने हे अंतराळवीर जेव्हां त्यांची मोहिम आवरती घेतात, तोवर त्या प्रजातीच्या मनात त्यांची 'देव' म्हणून प्रतिष्ठापना झालेली असते. त्यांनी दाखविलेल्या अनेक वैज्ञानिक अविष्कारांचे चमत्कार झालेले असतात. कालांतराने त्या अंतराळवीरांच्या निवासाचे, वावराचे कित्येक संदर्भ, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा ठेवा, त्यांनी मागे सोडलेल्या गोष्टी त्या प्रजातीत कथारुपाने रुजतात. पुढल्या कित्येक पिढ्यांपर्यंत त्या गोष्टींमध्ये, तथ्यांमध्ये, अनेक बर्यावाईट, सत्यासत्य संदर्भांची, सरमिसळ होत राहते.
Stargate नावाच्या एका विज्ञानपटात आणि स्टारट्रेक ह्या विज्ञानमालिकेच्या काही भागात, अशाच प्रकारच्या संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला आहे.
मानवी इतिहासातील वसाहतीकरणाचे वेगवेगळे प्रसंग व त्या प्रसंगांच्या वेळी वसाहतीकरण करणार्या प्रगत जमातींचे वर्तन व स्थानिक जमातींचा त्या संबंधाने प्रतिसाद, त्यांच्या प्रतिक्रिया विचारात घेतल्या, तरीही डॅनिकनच्या काहीशा एककल्ली वाटणार्या विचारामागील पार्श्वभूमी लक्षात येऊ शकेल.
------
ह्या तिसर्या नियमावरही काही नोंद घेण्यासारख्या टिप्पण्या झाल्या आहेत.
वरवर तिसर्या नियमाच्या विरोधात वाटणारी, पण प्रत्यक्षात त्या नियमाला एकाप्रकारे पुष्टी देणारी, एक टिप्पणी अशी आहे :
'कोणतेही तंत्रज्ञान, जे जादू वाटत नाही ते अद्याप पुरेसे प्रगत झालेले नाही.' ('Any technology distinguishable from magic is insufficiently advanced.' -- Barry Gehm - Chemistry Professor and Science Contributor)
--
आणखी एक उल्लेखनीय टिप्पणी आहे, Michael Shermer ह्या प्रसिद्ध 'संशयवादी' (Sceptic / Skeptic) व्यक्तीची. :
कोणतीही पुरेशी अतिप्रगत असलेली पृथ्वीबाह्य प्रजाती वा अतिदूरच्या काळातील अतिप्रगत झालेली मानव प्रजाती आणि देव ह्यात भेद करता येणार नाही.
('Any sufficiently advanced extraterrestrial intelligence or far-future human would be indistinguishable from God.')
एकापरीने ही टिप्पणी डॅनिकनच्या दाव्याला बळ देणारी आहे.
------
------
ह्या तीन नियमांच्या अनुषंगाने, एका मुलाखतीत क्लार्कला विचारण्यात आले होते की
'पुढील काळात तुमच्या लेखनात आणखी काही नियमांचा समावेश होऊ शकेल का ?' त्यावेळी क्लार्कने दिलेले उत्तर, त्याच्या तीन नियमांच्या परिपूर्णतेच्या दृष्टीने अतिशय चपखल होते.
“As three laws were good enough for Newton, I have modestly decided to stop there.”
प्रत्यक्षात मात्र, (उपलब्ध माहीतीनुसार,) नंतरच्या काळात आणखी एक नियम त्याच्या खात्यात जमा करण्यात आला, ज्याचा प्रत्यय आपण रोजच्या जीवनात, टी.व्ही. वरील चर्चांमध्ये, परिसंवादांमध्ये, वादांमध्ये, इतकेच काय तर, फेसबूकवर देखील नित्यनेमाने घेतो.
“For every expert, there is an equal and opposite expert.”
:-)
====
====
तळटीपा :
१) पहिला नियम सध्याच्या कोणत्याही प्रसंगाला वा विशिष्ट शास्त्रज्ञाला, व्यक्तीला वा त्यांच्यासारखा विचार करणार्या फेसबूक वा अन्य समूहाला लागू होतो असे कुणाला वाटल्यास, तो योगायोगच समजावा, असा काही माझा आग्रह नाही. :-)
२) कृपया हा लेख केवळ आणि केवळ तीन नियमांच्या संदर्भानेच वाचावा. त्या नियमकर्त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ जोडून, ह्या लेखाचे तर्हेतर्हेचे अर्थ काढू नयेत, ही विनंती.
३) ह्या लेखावरील विषयाला धरून केलेल्या सर्व प्रकारच्या टिप्पण्यांचे स्वागत आहे. अर्थातच शिव्या वा शिवराळ भाषा अपेक्षित नाही. :-)
४) हा लेख माझ्या, https://vidnyansrushti.blogspot.com/ ह्या ब्लॉगवर देखील आहे, ज्यांना स्वत:चे नाव लपवून टिप्पणी करावयाची असेल, प्रतिवाद करायचा असेल , ते तिथे टिप्पणी करू शकतात :-)
====
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा