मिट्ट काळोख आणि एकाकी वाटचाल. कुठे जायचे आहे ते ठरलेले नाही. माझ्यावर आता तसे कुठलेच बंधन नाही. पण तरीही मी कुठलेही लक्ष्य ठरवलेले नाही. खरंतर मी आता लक्ष्य ठरवूच शकत नाही. कितीतरी काळापूर्वी पावलांना एक वेग आला आहे, त्याच वेगाने, किती दूरवर प्रवास केला, ते आता नीटसे लक्षात नाही. वाटेत आता कुणी सोबती मिळेल असे वाटतही नाही. डोळ्यांनी कधीच दगा दिला आहे. तरीही दूरवर कुठे प्रकाश असल्याचे जाणवते कधीकधी, पण तिथे मी पोहोचू शकेन याची शाश्वती नाही वाटत आता. एकेक अवयव, इंद्रिय क्रमाक्रमाने निकामी होत चालले आहे. स्मृती मात्र अजून शाबूत आहे. घरच्यांचा निरोप घेऊन चाळीस वर्षे होतील आता. पण मी त्यांना नियमित निरोप पाठवत राहिलो आहे, त्यांना ते मिळत आहेत की नाही कुणास ठाऊक. त्यांचे उत्तर येण्याचे देखील जवळजवळ थांबले आहे, पण मी त्याची खंत करत नाही. हा मार्ग निवडला, तेंव्हा जे जे ठरवले होते, ते सारे मी साध्य केले आहे, याचेच समाधान आहे. त्यानंतरही, मला स्वत:लाही अपेक्षित नसलेले देखील, बरेच काही मी केले आहे घरच्यांसाठी. इतक्या दूरवरून आणि अशा अर्धविकलांग स्थितीत, आणखी फारसे करण्यासारखे देखील काही नाही. इतके नानाविविध अनुभव झेलले आहेत, या जीवनप्रवासात, की आता अनपेक्षित काही घडेल, याचे भय देखील राहिले नाही. आता पुढचा प्रवास निरपेक्ष आहे. जे जसे समोर येईल तसे अनुभवायचे आहे, शक्य होईल तोवर त्याची नोंद करणार आहे, ते अनुभव घरी पाठवणार आहे, पुढे कुणालातरी त्याचा फायदा होईल या एकमेव हेतूने.
Voyager-1 या नासाच्या अंतराळयानास स्वत:चे मन असते, तर कदाचित आज त्या यांनाने असाच काहीसा विचार केला असता.
५ सप्टेंबर १९७७ रोजी Voyager-1 ने Titan ३ या अग्निबाणाच्या (Rocket) साहाय्याने उड्डाण केले, त्याला आता काही दिवसात ४० वर्षे पूर्ण होतील. त्याच्या आधीच २० ऑगस्टला त्याच्या जुळ्या भावंडाने, Voyager - 2 ने, देखील अंतराळात झेप घेतली होती. (Voyager 1 त्याच्या नियोजित मार्गामुळे ते गुरु, शनि यांना आधी भेट देणार होते, त्यामुळे Voyagers चे क्रमांक, असे उड्डाणांच्या दिनांकांच्या विपरीत आहेत) दोघांचाही उद्देश आपल्या सूर्यमालेतील बहिर्ग्रहांचा अभ्यास, हाच होता. Mariner 10 या अंतर्ग्रहांचा अभ्यास करणार्या यानाने, सर्वप्रथम वापरलेले Gravity assist चे तंत्र वापरुन या दोन्ही यानांनी, विशेषत: Voyager 1 या यानाने घेतलेली झेप आणि ठरविलेले लक्ष्य ओलांडून, अवकाश संशोधनाचा आणि जिज्ञासाशमनाचा जो टप्पा गाठला तो, या क्षेत्रातील पुढच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Voyager ज्या काळात प्रक्षेपित करण्यात आली, त्या काळाच्या मानाने विचार केला, तर ही दोन्ही याने, उपकरणे आणि सुविधा या दृष्टीने परिपूर्ण होती. पण तांत्रिक गोष्टींपलीकडे Voyager चा उपयोग एखाद्या कालकुपी सारखा किंवा दूरच्या एखाद्या प्रगत संस्कृतीसाठी, विझिटिंग कार्डसारखी करण्याची कल्पना खरंच अभिनव होती. मानवाची ओळख करून देणार्या जगातील ज्या विविध गोष्टी Voyager सोबत होत्या, त्यात एक सोन्याची रेकॉर्ड डिस्क देखील होती (अर्थातच प्लेबॅकच्या सोयीसह). या रेकॉर्डवर असणार्या ३१ ट्रॅकपैकी एक ट्रॅक, केसरबाई केरकर यांच्या भैरवी गायनाच्या तुकड्याचाआहे (यूट्यूबवर उपलब्ध आहे). आणखी एक, माझ्या विशेष परिचयाचा आणि मुद्दाम उल्लेख करावा असा, दुसरा ट्रॅक म्हणजे Back To The Future या चित्रपटात, निर्णायक प्रसंगात वापरलेले आणि अत्यंत गाजलेले, चक बेरीचे Johnny B. Goode हे गाणे.
Voyager 1 ही पृथ्वीपासून सर्वात दूर (जवळजवळ २१ अब्ज किमी), सूर्यमालेला ओलांडून, पलीकडे InterStellar Space (तारांगण) मध्ये पोहोचलेली पहिली मानवनिर्मित वस्तू. त्याच्यापासून निघालेले संदेश (प्रकाशाच्या वेगाने) मिळायला आता १९ तासांपेक्षाही जास्त वेळ लागत आहे. आज या यानांकडून मिळणार्या नवीन माहितीचा ओघ कमी झाला असला, तरी अवकाशसंशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, Voyager बद्दल आणि Voyager ने प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चालना दिलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे.
अंतराळातील संपर्क यंत्रणेच्या वेगाने झालेल्या प्रगतीला, अप्रत्यक्षपणे Voyager याने कारणीभूत ठरली असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. नासाच्या Deep Space Network (DSN) ची रचना आणि प्रत्यक्ष त्याच्या कामाची सुरुवात नासाच्या (अधिकृत) स्थापनेनंतर काही काळातच झाली होती. नासाच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेसोबत DSN मध्ये आवश्यक तशी भर पडत गेली, त्याची क्षमता वाढत गेली. मात्र पृथ्वीपासुन सतत अधिकाधिक दूर जाणार्या Voyagers शी संपर्कात राहण्यासाठी मोठी झेप आवश्यक होती. इतक्या दूरपर्यंत पृथ्वीवरील संदेश पोहोचावा, यासाठी अधिक ऊर्जा धारण करू शकणारे व पर्यायाने अधिक वारंवारिता (frequency) असलेले संदेश पाठविणे आवश्यक होते. हे संदेश प्रक्षेपित करण्यासाठी स्वाभाविकच अधिक मोठ्या (डिश) अँटेनांची आणि एकंदरच त्यावेळेस वापरात असलेल्या setup मध्ये मोठे बदल आवश्यक होते. या आधुनिकीकरणांतर्गत प्रथम कॅलिफोर्निया आणि त्याच्या मागोमाग स्पेन आणि ऑस्ट्रेलिया येथील ६४ मीटरच्या (आणि काही त्यापेक्षाही लहान असलेल्या) व्यासाच्या सर्व अँटेना, ७० मीटरच्या करण्यात आल्या. तंत्रज्ञान आणि खर्च या दोन्ही दृष्टिकोनातून ही खूप मोठी उडी होती.
अँटेनांचा आकार एका मर्यादेपलीकडे वाढविता येणार नाही हे लक्षात घेऊन, Voyager पासून पृथ्वीपर्यंत पोहचणारे अतिशय अस्पष्ट असणारे संदेश देखील पकडता यावेत, यासाठी विविध अँटेनांचा समूह (array) बनवून, त्यांनी पकडलेल्या संदेशांचे एकत्रीकरण करून, संदेशांची क्षमता वाढविण्यात नासा यशस्वी झाली. हे केल्यानंतरही, जेंव्हा अधिक क्षमतेची आवश्यकता भासली, तेंव्हा इतर देशांच्या अँटेनांचे देखील साहाय्य घेण्यात आले. यातून 'एकमेका साह्य करू' चे धोरण स्वाभाविकपणे वापरात आले आणि भाडेतत्वावर किंवा करारान्वये परस्परांचे नेटवर्क उपलब्ध होऊ लागल्याने, अँटेना उभारण्याच्या एकूण खर्चात बचत तर झालीच, पण पृथ्वीच्या कोणत्याही भागातून अशा संदेशांचा मागोवा घेणे अधिक सोपे झाले. मंगलयानाच्या वेळेस या नेटवर्कचा आपल्यालाही लाभ झाला होता. आपल्या हरवलेल्या 'चांद्रयान १' चा orbiter याच नेटवर्कने मध्यंतरी 'शोधला' होता.
इतक्या दूरवरून येणारे संदेश ज्या चॅनलमध्ये प्रवास करतात, तिथे बर्याच मोठ्या प्रमाणात noise असतो. या noise ला दूर करण्याची जी अनेक तंत्रे वापरली जातात, त्यापैकी एक प्रमुख आहे Error Correcting Codes (ECC). कालौघात ECC च्या, ज्या अनेक पद्धती विकसित झाल्या त्यातील एक आहे Reed-Solomon coding. ही पद्धत Voyager मध्ये प्रथम वापरली गेली. कालांतराने CD, DVD आणि काही HardDisk वरील 'media defects' टाळून त्यातील data वाचण्यासाठी देखील हीच पद्धत उपयोगात आणली गेली. (आपल्याकडे ऋचांना अपभ्रंशांचा दोष लागू नये म्हणून ज्याप्रमाणे पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ, घनपाठ इत्यादि पद्धती (विकृती) निर्माण केल्या गेल्या, काहीशी तशाच प्रकारची पुनरुक्तीची संकल्पना विविध ECC मध्ये वापरलेली असते)
अंतराळ संशोधनाच्या निमित्ताने आखलेल्या अवकाश मोहिमा, मानवी आयुष्य समृद्ध, सोपे करण्यासाठी कशा उपयोगी पडू शकतात त्याचे Voyager हे एक ठळक उदाहरण आहे.
Voyager 1 ने गुरु, शनि , यूरेनस आणि नेपच्यून या चारही ग्रहांच्या बाबतेत अत्यंत थक्क करणारी माहिती आपल्यापर्यंत प्रथम पोहोचवली,पण Voyager 1 ने लावलेल्या त्याहूनही अधिक महत्त्वाच्या शोधांमुळे/निष्कर्षांमुळे सूर्यमालेसंबंधींच्या आपल्या अनेक संकल्पनांना पार बदलून टाकले. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र आणि पर्यायाने सूर्यमालेची व्याप्ती, आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक विस्तृत आहे हे Voyager 1 ने आपल्याला सांगितले. Termination Shock, Heliosheath, Heliopause, Heliotail आणि पर्यायाने InterStellar Space यांचे सीमाप्रदेश (सीमारेषा नव्हे) साधारण किती अंतरावर आहेत, याचा बर्यापैकी अंदाज आला.
(आपल्या सूर्यापासून निघणार्या) सौरवातास (Solar Wind), आकाशगंगेतून झिरपलेल्या (आणि प्रामुख्याने) हायड्रोजन, हिलियम, धूळ आणि वैश्विक किरण यांनी बनलेल्या Interstellar Medium (ISM) कडून सतत 'विरोध' होत असतो. या संघर्षात सूर्यापासून निघणार्या सौरवाताचे प्रमाण हळूहळू घटत जाते आणि Heliosheath मध्ये ते अतिविरळ होते या समजुतीला Voyagers च्या निरीक्षणातून् काहीसा धक्का मिळाला. Voyager 1 ने विविध अंतरावर नोंदलेले सौरवाताचे प्रमाण आणि Voyager 2 यांनी नोंदलेली निरीक्षणे यात फरक होता. यातून समोर आलेला निष्कर्ष अप्रत्यक्षपणे असे सुचवत होता की, तिथे असलेले चुंबकीय क्षेत्र आपल्याला परिचित असलेल्या चुंबकीय रेषांसारखे नसून, ते पसरलेल्या अतिविशाल चुंबकीय बुडबुड्यांसारखे असावे. या चुंबकीय बुडबुड्यांचे महत्त्व अशासाठी आहे की, सूर्यमालेबाहेरून येणार्या वैश्विक किरणांसाठी हे चुंबकीय बुडबुडे एखाद्या पिंजर्याप्रमाणे काम करतात आणि वैश्विक किरणांमधील तीव्र उर्जाभारीत कण, या 'पिंजर्यांमध्ये' अडकून पडतात. थोडक्यात हे चुंबकीय बुडबुडे आपल्या सूर्यमालेसाठी वैश्विक किरणांपासून सुरक्षाकवच म्हणून काम करत असावेत असा सध्याचा निष्कर्ष आहे. या शोधाचा उपयोग भविष्यात कदाचित दूरच्या अवकाशप्रवासात वैश्विक किरणविरोधी यंत्रणा उभारण्यासाठी होऊ शकेल.
'To boldly go where no man has gone before' ही स्टारट्रेकच्या 'शीर्षकसंवादातील' ओळ सार्थ करत, Voyager 1 सध्या साधारण १७ कि.मी. / सेकंद या वेगाने अनोळखी लक्ष्याच्या दिशेने आणि एका अर्थाने अनंताच्या प्रवासास निघाले आहे. हा वेग विलक्षण आहे कारण Voyager च्या तब्बल ३१ वर्षे नंतर, Voyager 1 पेक्षा कितीतरी अधिक वेगाने अवकाशात प्रक्षेपित झालेले आणि अधिक प्रगत, सक्षम उपकरणांनी समृद्ध असलेले New Horizons, जेंव्हा आज Voyager 1 ज्या अंतरावर आहे तिथे पोहोचेल, तेंव्हा आजच्या अनुमानाप्रमाणे त्याचा वेग केवळ १३ कि. मी. / सेकंद इतकाच असेल. Internal Oort cloud चा टप्पा गाठायला त्याला अजून किमान ३०० वर्षे लागतील आणि एकंदर Oort cloud ओलांडायला साधारण ३०,००० वर्षे ! . सध्याच्या अनुमानाप्रमाणे, Voyager 1 शी आपला संपर्क फारफार तर २०२५ पर्यंत टिकेल. थोडक्यात, तंत्रज्ञानात काहीतरी आमूलाग्र बदल झाल्याशिवाय, Voyager 1 ने Oort Cloud चा टप्पा गाठला आहे हे आपल्याला कळण्याची शक्यता जवळ जवळ नाही. शिवाय २०२५ पर्यंत Voyager 1 सोबतची सर्व उपकरणे बंद पडलेली असतील.
काही वर्षांपूर्वी मी एक विज्ञानकथा वाचली होती. कथेचे नाव आणि लेखक आठवत नाही, पण त्यात काही हजार वर्षांनंतरच्या भविष्यकाळातील चित्र रेखाटले होते. कथा खूप वेगळी होती आणि त्यामुळे लक्षात राहिली. एक अनोळखी यान आपल्या सूर्यमालेच्या परिसरात येते आणि त्याच्याशी कुठलाही संपर्क होऊ न शकल्याने, त्या यानावर आक्रमण करून ते नष्ट करण्याचा निर्णय, आंतरग्रहीय शासन यंत्रणा घेते. हा निर्णय अंमलात आणला जाणार, इतक्यात उपलब्ध झालेली छायाचित्रे आणि अतिप्राचीन नोंदींचा उपयोग करून, एक 'इतिहासकार' हे सिद्ध करतो की हे परकीय यान नसून, मानवानेच प्रक्षेपित केलेले सोडलेले Voyager 1 आहे. साहजिकच त्या यानास समारंभपूर्वक पृथ्वीवर परत आणण्याच्या निर्णय होतो आणि तो अंमलात देखील आणला जातो. पण घडते ते भलतेच. ते यान Voyager 1 नसून, त्याची प्रतिकृती असते. एखाद्या Trojan Horse प्रमाणे ते यान काम करते, पृथ्वीवर अगम्य, असाध्य रोग पसरतो, जो अंतिमत: मानवाच्या अस्तित्वासाठी नवे आव्हान ठरतो.
ही कथा वाचल्यावर मनात असा विचार आला होता की आज आपले नोंदी ठेवण्याचे, इतिहास जपण्याचे, एखाद्या गोष्टीची पडताळणी करण्याचे शास्त्र पूर्वीपेक्षा विलक्षण प्रगत झाले आहे. अशा परिस्थितीत कित्येक हजारो वर्षांनी, अशी फसगत शक्य आहे का ? थोडेसे पटायला अवघड जाईल, पण असे होणे शक्य आहे. जसजसे नवीन तंत्रज्ञान येते, तसतसे जुने कालबाह्य होते आणि कालबाह्य होताना ते 'निरुपयोगी' तंत्रज्ञान अवगत असणारे, त्याच्याशी जुळवून घेऊ शकणारे मनुष्यबळ, त्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारी उपकरणे देखील नाहीशी होतात. नामशेष होऊ पाहणार्या, 1.2 MB चा फ्लॉपीड्राईव्ह किंवा Gramophone चे उदाहरण घेतले तरी हे पटेल. कदाचित थोडे विचित्र वाटेल, पण मध्यंतरी वाचलेल्या एका बातमीनुसार Voyager 1 शी संपर्क ठेवणार्या Software मध्ये काही बदल करण्यासाठी , COBOL आणि FORTRAN या भाषांमध्ये उत्तमपणे पारंगत असलेले Programmers हवे होते, तेंव्हा ते मिळवण्यासाठी नासाला जाहिरात दिल्यानंतरही, थोडे कठीण गेले होते. आज ही परिस्थिती असेल तर हजारो वर्षांनी काय घडू शकेल याची कल्पना आपण करू शकतो. Susan Finley नावाची एक वरिष्ठ कर्मचारी नासामध्ये जानेवारी १९५८ पासून कार्यरत आहे. Explorer 1 हा उपग्रह प्रक्षेपित झाला, तेंव्हापासून ते आजच्या New Horizon पर्यंत. तिच्याकडे त्या काळापासून असलेल्या आणि आता बहुदा कालबाह्य झालेल्या सर्वच्या सर्व कौशल्यांचे, अनुभवाचे सुयोग्य Documentation आणि हस्तांतरण झाले असेल असे मानणे थोडेसे धाडसाचे ठरेल.
तंत्रज्ञानाचा उगम, विकास, वापर व लोप ही वारंवार घडणारी प्रक्रिया आहे हे मान्य न करणारे, अनेकजण आजही आपल्याला आजूबाजूला दिसतात की. :-)

खूप सुंदर लेख.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा